Homeमनोरंजनभगवान श्रीकृष्णांचे दिव्य विचार आत्मसात करून जीवनाचे सार्थक करावे – हभप प्रल्हाद...

भगवान श्रीकृष्णांचे दिव्य विचार आत्मसात करून जीवनाचे सार्थक करावे – हभप प्रल्हाद महाराज येवले

विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) : गेवराई तालुक्यातील विविध पांडुरंग देवस्थानाच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त ९ ते १६ मार्च दरम्यान श्रीमद भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण व हरिकीर्तनाचे विविध आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कथा सोहळ्याच्या पाचव्या दिवशी भागवताचार्य हभप प्रल्हाद महाराज येवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, ज्या वेळी धर्माची ग्लानी होते आणि अधर्म वाढतो, त्या वेळी परमात्मा विविध रूपात अवतार घेऊन भक्तांचे रक्षण व दुर्जनांचा नाश करतो. भगवान श्रीकृष्णांचे जीवन आणि विचार हे मानवजातीसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या दिव्य विचारांचे आचरण केल्यास मनुष्याचे जीवन अधिक अर्थपूर्ण आणि आनंदी होऊ शकते.

तसेच त्यांनी सत्यकर्म, नामस्मरण आणि सात्विक विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. मनुष्य आपल्या कर्मांमुळेच देवत्व प्राप्त करतो किंवा त्यापासून दूर जातो. त्यामुळे प्रत्येकाने सत्यकर्माचा मार्ग स्वीकारून जीवनात चांगले विचार आणि संस्कार जोपासावेत, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी मुलांच्या घडणीत आईच्या संस्कारांचे महत्त्वही स्पष्ट केले. आई ही मुलांना घडवणारी मोठी शक्ती असून तिच्या संस्कारांमुळेच महान व्यक्तिमत्त्वांची निर्मिती होते. राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले, असे सांगत प्रत्येक घरात जिजाऊंसारख्या मातांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

सोहळ्यात पहाटे रामधून, काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी श्रीमद भागवत कथा आणि सायंकाळी हरिपाठ व हरिकीर्तन अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. या आध्यात्मिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून गेवराई तालुक्यातील विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गोंडवाना विद्यापीठाच्या कला महोत्सवात ने.हि. महाविद्यालयाचा झेंडा; समूहगीत व एकलगीतात प्रथम

0
रुपेश देशमुख  ( ब्रह्मपुरी प्रतिनिधी ) : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत प्राध्यापकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कला महोत्सव स्पर्धेत ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी...

हिंगणे बु. येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

0
विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) :  जामनेर तालुक्यातील हिंगणे बु. येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने “पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळा” उत्साहात पार...

नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी २२ हजार कोटींच्या विकासकामांना मंजुरी

0
 विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : मुंबई – नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन,...

रायसीना इंग्लिश स्कूलचे दहावे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात, मुलांना बालवयातच चांगले संस्कार द्या – एपीआय...

0
विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) :  प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांकडे वेळीच लक्ष देवून आपल्या मुलांना बालवयातच चांगले संस्कार द्यावेत तसेच मुलांनी एआय तंत्रज्ञानाचा...

पाठ फिरवून उभे असलेले दोन जीव; शरीराने जवळ, पण मनाने दूर गेलेले नाते.

0
रुपेश देशमुख (प्रतिनिधी-ब्रह्मपुरी) : आजच्या डिजिटल युगात आपण एका विचित्र विरोधाभासात जगत आहोत. फेसबुकवर 'फॅमिली व्हॅकिशन'चे अल्बम पडतात, इन्स्टाग्रामवर 'हॅपी ॲनिव्हर्सरी'चे रिल्स व्हायरल होतात...

error: Content is protected !!