तालुका (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): गेवराई तालुक्यात क्रांती महिला असंघटीत कामगार संघटना गेले पाच वर्षापासून एकल व इतर महिलांच्या प्रश्नावर काम करत असून प्रत्येक समाजात विधवा महिलांची संख्या दिवसान दिवस वाढत असून तसेच घटस्फोटीत, परितक्त्या, विधवा, प्रौढ कुमारीका यांची कुठेही नोंद नसल्याने या महिलेविषयी असलेल्या शासकीय योजना यांना मिळत नाही व त्या या योजनेपासून त्यांना वंचित राहावे लागते. त्यामुळे त्यांचे विषयी ठोस धोरण ठरवता येत नाही. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यातील एकल महिलांची संख्या एकत्रितरित्या करण्यासाठी आपल्या तालुक्यात घटस्फोटीत, परितक्त्या, विधवा, प्रौढ कुमारीका यांसाठी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात एकल महिलांची स्वतंत्र रजिस्टरमध्ये नोंदणी करुन ती रजिस्टर अद्यावत करण्यात यावे, अशी मागणी एकल महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या व एकल महिला संघटनेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या एकल महिला संघटनेच्या नेत्या रुक्मिणी ताई नागापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पंचायत समितीतील गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांना निवेदन देण्यात आले यावेळी शकुंतला बुगासे प्रियंका जाधव सुमित्रा इंगळे यांच्यासह शेकडो ही महिला पंचायत समितीमध्ये निवेदन देता येईल बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी एकल महिला संघटनेच्या नेत्या रुक्मिणी ताई नागापुरे यांनी यावेळी सांगितले की जोपर्यंत एकल महिलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात एकल महिला संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात येतील असे यावेळी सांगितलेगेवराई






















