बुलढाणा (प्रतिनिधी अनिल वायाळ): बिरसा क्रांती दल अमरावती विभागीय उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती लोणारचे संचालक भगवान राव कोकाटे यांनी बिरसा मुंडा यांचे प्रतिमेला हार घालून पूजा करून अभिवादन केले.यावेळी भगवानराव कोकाटे यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश म्हणाले भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारक आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे बिरसा मुंडा यांची आज पुण्यतिथी बिरसा मुंडा यांना आदिवासी समाजात देवाचं स्थान प्राप्त आहे.त्यांनी झारखंड, बिहार, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल विविध भागात आदिवासींच्या हक्कांच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिले.केवळ 24 व्या वर्षी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या बिरसा मुंडांनी एक वेगळीच छाप उमटवली आहे.
1857 चा उठाव दडपल्यानंतरही भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात ब्रिटिशांविरोधात उठाव सुरु झाले होते. त्यामध्ये 1895 ते 1900 सालाच्या दरम्यान मध्य भारतातील, छोटा नागपुरच्या प्रदेशात बिरसा मुंडा यांनी सुरु केलेली ‘उलगुलान’ चळवळ ही महत्वाची आहे. देशावर राज्य करणारे इंग्रजांच्या विरोधात लढा आणि आदिवासींच्या हक्कासाठी बिरसा मुंडा यांनी आपले जीवन व्यतीत केले असल्याचे यावेळी ते म्हणाले उपस्थित सर्वांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पंढरी कोकाटे,प्रसराम कोकाटे, दामोदर तनपुरे, मारोती गोऱ्हे, मुरलीधर कुटे,नारायण जाधव,गजानन दराडे ऑपरेटर शांताराम जाटले,रतन कोकाटे,एकनाथ डवरे ग्रामपंचायत शिपाई,धनेश्वर जाधव इत्यादी ग्रामस्थ हजर होते.






















