Homeआरोग्यनिफाड तालुक्यात सर्पदंशाची दुर्दैवी घटना; देवगावातील शेतकऱ्याचा मृत्यू

निफाड तालुक्यात सर्पदंशाची दुर्दैवी घटना; देवगावातील शेतकऱ्याचा मृत्यू

निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) :  तालुक्यातील देवगाव परिसरात सर्पदंशामुळे एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ७ एप्रिल रोजी सकाळी घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवगाव येथील महादेव नगर परिसरात राहणारे प्रशांत एल.जी. सोनवणे (वय ५३) हे आज सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात गवत कापत होते. यावेळी त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याजवळ अचानक सर्पदंश झाला. घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने त्यांना उपचारासाठी लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र, उपचारादरम्यान सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल राठोड यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप शिंदे पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे देवगाव परिसरात शोककळा पसरली असून शेतकऱ्यांनी शेतात काम करताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NEET नंतर आता MAHA TET पेपरफुटीचा स्फोट; उद्याची परीक्षा तात्काळ रद्द

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे ....

कारवाईचं आश्वासन… पण अजूनही कृती नाही! पुणे पोलीस भरतीतील ₹21 हजार वसुली प्रकरणात नेमकं...

0
पुणे पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कथितपणे ₹21 हजार रुपये उकळल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने सातत्याने लावून धरला आहे. सुरुवातीला हा केवळ आरोप...

ट्रॅक्टरच्या डिझेल पाईपमधून इंधन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर

0
राजगड (मध्य प्रदेश): निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात घडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना जमिनीवर पडलेली डिझेलची...

महा टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलली; ठाण्यात तपासाला वेग

0
मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) २८ जून रोजी होणार होती. मात्र ठाणे जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा...

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...

error: Content is protected !!