Homeताज्या बातम्याईद-उल-अजहा निमित्त सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये शांतता व कायदा सुव्यवस्थेबाबत बैठक

ईद-उल-अजहा निमित्त सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये शांतता व कायदा सुव्यवस्थेबाबत बैठक

(तालुका प्रतिनिधी जाबिर खान): दि. 26 मे 2026 रोजी सिरोंचा पोलीस स्टेशन येथे SDPO संदेश नाईक आणि M.K. नांदे यांच्या उपस्थितीत ईद-उल-अजहा (बकरी ईद) निमित्त महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत MIDC ट्रस्ट कमिटीचे सदर फाजील पाशा, सचिव अॅड. फिरोज खान, TV9 चे वरिष्ठ पत्रकार MD. इरफान, तसेच अय्यूब खान, दस्तगीर खान, रफीक कुरेशी, नजीम शेख, आशिक हुसेन, वरिष्ठ पत्रकार जाकिर अली आणि टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी जाबिर खान उपस्थित होते.

बैठकीदरम्यान ईदच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नमाजाच्या वेळा, लाऊडस्पीकर वापर, ईदगाह परिसरातील सुरक्षा व्यवस्था तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी SDPO संदेश नाईक यांनी तालुक्यातील वाहतूक नियंत्रण, ओव्हरस्पीड वाहनांवर कारवाई, ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिमा तसेच शेजारील राज्यांतून होणाऱ्या गोतस्करीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आल्याचे सांगितले. समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन विविध उपक्रम राबवत असून त्यामध्ये नागरिक व पत्रकारांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

सिरोंचा तालुक्यात माझ्या कार्यकाळात कोणतीही मोठी जातीय किंवा सामाजिक तणावाची घटना घडलेली नाही. पुढेही सर्वांनी एकोप्याने व शांततेत सण साजरे करावेत, असे आवाहन संदेश नाईक यांनी यावेळी केले.
बैठकीमुळे समाजात एकता, शांतता आणि परस्पर सहकार्याचा संदेश देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

महसूल खात्यात भ्रष्टाचाराचे जाळे? जनतेच्या विश्वासावर घाला; आता सर्वंकष चौकशीची वेळ!

0
  निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज राज्यातील सर्वसामान्य नागरिकाचा महसूल विभागाशी सर्वाधिक संबंध येतो. जमिनीची खरेदी-विक्री, सातबारा उतारा, फेरफार, वारस नोंद, मोजणी, सीमांकन,...

अल्पवयीन मुलांच्या वाहनचालकांविरोधात जळगाव शहर वाहतूक शाखेची धडक मोहीम; ४८ पालकांवर कारवाई

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) शहरातील वाढत्या वाहतूक अपघातांच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई...

error: Content is protected !!