Homeताज्या बातम्याजळगाव येथे कोळी महासंघाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

जळगाव येथे कोळी महासंघाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवांना जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने तसेच सरसकट देण्यासंदर्भात शासनाने तातडीने परिपत्रक जारी करावे, या प्रमुख मागणीसाठी कोळी महासंघाच्या वतीने दि. १६ जून २०२६ रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई येथे तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आदिवासी मंत्री यांच्या उपस्थितीत कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार मा. श्री. रमेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले होते. मात्र, अद्याप संबंधित शासन परिपत्रक जारी न झाल्याने समाजामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याच संदर्भात दि. २ जून २०२६ रोजी मुंबई येथे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्मरणपत्र देण्यात आले होते. तरीही निर्णयांची अंमलबजावणी न झाल्याने कोळी महासंघाच्या वतीने राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले आहे.

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार मा. श्री. रमेश दादा पाटील तसेच युवा प्रदेश अध्यक्ष अँड. चेतन दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
दि. १६ जून रोजी दुपारी १२ वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करून मा. जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन सादर करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुन्हे अन्वेषण विभागात बदली आदेश धाब्यावर?

0
पुणे : गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), महाराष्ट्र राज्य, पुणे येथील अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी होऊनही संबंधित कर्मचारी अद्याप मूळ ठिकाणीच कार्यरत असल्याचे समोर...

वन विभागात नेमका ‘आका’ कोण? बदलीनंतरही मिरा केंद्रे जुन्याच ठिकाणी

0
पुणे: वनवृत्तातील वनपाल संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या बदल्यांबाबत आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वनसंरक्षक (प्रादेशिक), पुणे कार्यालयाने जारी...

एरंडोल तालुक्यातील ६०० ब्रास वाळूसाठा प्रकरण पुन्हा चर्चेत तहसील कार्यालयाच्या अहवालामुळे प्रशासनात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार) :एरंडोल तालुक्यातील ६०० ब्रास वाळूसाठा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून तहसीलदार कार्यालयाने सादर केलेल्या अहवालामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. संबंधित...

लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात...

राज्यस्तरीय पुरस्काराने नवनाथ आव्हाड यांचा गौरव

0
सिन्नर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नवनाथ आव्हाड यांना माता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त प्रदान करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या "इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२६" या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल दोडी...

error: Content is protected !!