Homeताज्या बातम्यापाणीटंचाईवर मात; रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांना कर सवलत!

पाणीटंचाईवर मात; रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांना कर सवलत!

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख): आजचे बदलणारे हवामान, अनियमित पर्जन्यमान आणि वाढती पाण्याची मागणी यामुळे भूजल पातळी सातत्याने घटत चालली आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर, भविष्यातील भीषण पाणीटंचाईचे संकट वेळीच रोखण्यासाठी ब्रम्हपुरी नगर परिषदेने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. शहरात जलसुरक्षा निर्माण करण्यासाठी आणि नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ पावसाचे पाणी संवर्धन व पुनर्भरण यंत्रणा उभारणाऱ्या मालमत्तांना निव्वळ मालमत्ता करात प्रतिवर्ष ५ टक्के सूट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नगर परिषदेने घेतला आहे. ही सवलत कमाल १० वर्षांपर्यंत लागू राहणार आहे.

महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम, १९६५ मधील कलम १२७-ब अन्वये ब्रम्हपुरी नगर परिषदेने आपल्या विशेष आमसभेत या योजनेला मंजुरी दिली. वाढत्या नागरीकरणामुळे पावसाचे लाखो लिटर पाणी नाल्यांद्वारे वाहून वाया जाते. हेच पाणी जर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून विहिरी, कूपनलिका (बोअरवेल) किंवा जमिनीत योग्य पद्धतीने मुरविले, तर जलस्रोतांची पाणीपातळी वाढण्यास मोठी मदत होईल. ही योजना संपूर्ण शहराच्या जलसुरक्षेला मोठे बळ देणारी ठरणार आहे.

या अभिनव योजनेप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष योगेश मिसार यांनी नागरिकांना भावनिक व जाहीर आवाहन केले आहे. मिसार म्हणाले की “पाणी हा निसर्गाने दिलेला अमूल्य ठेवा आहे. आज आपण पावसाचा प्रत्येक थेंब जपला तरच उद्या आपल्याला पाण्याची सुरक्षितता राहील. ब्रम्हपुरी शहरातील प्रत्येक घर, संस्था, व्यावसायिक आस्थापना आणि उद्योगांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली उभारून जलसंवर्धनाच्या या सहभागी व्हावे. पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देणाऱ्या नागरिकांचा सन्मान म्हणून नगर परिषद मालमत्ता करामध्ये सूट देत आहे. ही सूट आर्थिक लाभापेक्षा सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारी एक छोटीशी प्रेरणा आहे. प्रत्येक नागरिकाने या संधीचा लाभ घेत शहराच्या जलसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा.”

नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांनी योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रशासकीय भूमिका मांडताना सांगितले: की “ब्रम्हपुरी नगर परिषद शहरातील प्रत्येक नागरिकाने आपल्या मालमत्तेमध्ये पावसाचे पाणी संवर्धन व पुनर्भरण व्यवस्था उभारावी, अशी अपेक्षा बाळगून आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मालमत्ता करामध्ये ५ टक्के सूट देण्यात येणार आहे. नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेत जलसंवर्धनासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा. जलसंधारण ही केवळ शासनाची किंवा पालिकेची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...

भंडारा येथे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): भंडारा येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालयात लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती तसेच जागतिक अमली पदार्थ विरोधी...

दौंड मध्ये छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने उत्साहात...

0
दौंड (प्रतिनिधी-मयूर साळवे संघराज गायकवाड): सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचे महान पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त भारत मुक्ती मोर्चा, दौंड...

निफाड तालुक्याचे शान, नव्यानिर्वाचित आमदार निफाडचे भूमिपुत्र गोकुळ भाऊ गीते यांचा करंजगावात भव्य सत्कार

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव व योगेश कर्डिले): निफाड तालुक्याचे शान आणि नव्यानिर्वाचित आमदार, निफाडचे भूमिपुत्र गोकुळ भाऊ गीते यांचा करंजगाव ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आणि...

पुरोगामी महाराष्ट्र फक्त भाषणातच? कृतीत मात्र वाढता जातीयवाद आणि स्वार्थी राजकारण

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज — न्याय, समानता आणि सर्वसमभावाच्या विचारांना राजकीय स्वार्थाचा फटका. महाराष्ट्राची ओळख ही केवळ भौगोलिक सीमांमुळे नाही, तर सामाजिक...

error: Content is protected !!