Homeताज्या बातम्यागेवराईत विशेष मतदार यादी पुनरीक्षणासाठी BLO, पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण संपन्न

गेवराईत विशेष मतदार यादी पुनरीक्षणासाठी BLO, पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण संपन्न

गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): निवडणूक भारत आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, सर्वसमावेशक व त्रुटीमुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत गेवराई तालुक्यातील पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), BLO सहाय्यक व ऑपरेटर यांचे प्रशिक्षण शुक्रवारी (दि. 26 जून) तहसील कार्यालय गेवराई येथे सभागृहात उत्साहात पार पडले.
मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन सुनील शेरखाने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रभारी तहसीलदार संजय सोनवणे, मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, गट विकास अधिकारी अनिरुद्ध सानप, नायब तहसीलदार निवडणूक कमल कुटे, निवासी नायब तहसीलदार सुभाष कट्टे, नायब तहसीलदार पुरवठा गजानन मोरे, निवडणूक विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच 228 गेवराई विधानसभा मतदारसंघांतील पर्यवेक्षक, BLO, सहाय्यक आणि ऑपरेटर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना मतदार यादीतील प्रत्येक नोंद अचूक व अद्ययावत राहण्यासाठी घरभेटी, माहिती पडताळणी आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. BLO यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घराला भेट देऊन Enumeration Form चे वितरण व संकलन करावे

तसेच सर्व माहिती BLO App मध्ये वेळेत नोंदवावी, असे निर्देश देण्यात आले. प्रशिक्षणात 20 जून ते 29 जून या पूर्वतयारी टप्प्यातील कामकाज, स्वयंसेवक व स्थानिक यंत्रणांशी समन्वय, BLO App चा वापर तसेच आवश्यक नोंदवह्यांचे व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तर 30 जून ते 29 जुलै या कालावधीत घरभेटी, फॉर्म संकलन, माहितीची ऑनलाईन नोंद व पडताळणी प्रक्रिया कशी राबवायची याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या. ASDD (Absent, Shifted, Dead, Duplicate) प्रकरणांबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देत कोणताही पात्र मतदार चुकीच्या पद्धतीने वगळला जाणार नाही याची खात्री करण्यावर भर देण्यात आला. घर बंद अथवा न सापडणाऱ्या मतदारांच्या बाबतीत किमान तीन वेळा भेटीची नोंद ठेवणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

तसेच प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी, दावे-हरकती प्रक्रिया, सुनावणी, नोटीस वितरण आणि जनजागृती मोहिमेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. पर्यवेक्षकांच्या जबाबदाऱ्यांवर विशेष भर देत चुकीची माहिती, अपूर्ण पडताळणी अथवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर प्रशासकीय व शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी सुबोध जैन, विशाल कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी, गिरीश जोशी, सारंग देशपांडे, बापूसाहेब तारुकर, दीपक घाडगे , दीपक राठोड तसेच निवडणूक विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
गेवराई तालुक्यातील मतदार यादीचे शंभर टक्के शुद्धीकरण करून ती अधिक अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून या मोहिमेत सर्व संबंधितांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्र तहसीलदार संजय सोनवणे यांनी प्रशिक्षणाच्या समारोपावेळी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...

भंडारा येथे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): भंडारा येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालयात लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती तसेच जागतिक अमली पदार्थ विरोधी...

दौंड मध्ये छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने उत्साहात...

0
दौंड (प्रतिनिधी-मयूर साळवे संघराज गायकवाड): सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचे महान पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त भारत मुक्ती मोर्चा, दौंड...

निफाड तालुक्याचे शान, नव्यानिर्वाचित आमदार निफाडचे भूमिपुत्र गोकुळ भाऊ गीते यांचा करंजगावात भव्य सत्कार

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव व योगेश कर्डिले): निफाड तालुक्याचे शान आणि नव्यानिर्वाचित आमदार, निफाडचे भूमिपुत्र गोकुळ भाऊ गीते यांचा करंजगाव ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आणि...

पुरोगामी महाराष्ट्र फक्त भाषणातच? कृतीत मात्र वाढता जातीयवाद आणि स्वार्थी राजकारण

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज — न्याय, समानता आणि सर्वसमभावाच्या विचारांना राजकीय स्वार्थाचा फटका. महाराष्ट्राची ओळख ही केवळ भौगोलिक सीमांमुळे नाही, तर सामाजिक...

error: Content is protected !!