Homeताज्या बातम्याएकलव्य कॉलेज ते पुणे-बंगळुरू महामार्गापर्यंत रस्त्याचे काम होणार; २ किमीचा वळसा वाचणार.

एकलव्य कॉलेज ते पुणे-बंगळुरू महामार्गापर्यंत रस्त्याचे काम होणार; २ किमीचा वळसा वाचणार.

एकलव्य कॉलेज ते पुणे-बंगळुरू महामार्गापर्यंत रस्त्याचे काम होणार; २ किमीचा वळसा वाचणार…

पुणे : कोथरूड येथील एकलव्य कॉलेज ते पुणे -बंगळुरू महामार्गापर्यंतचा अर्धवट रस्ता मिसिंग लिंक अतंर्गत लवकरच सुरू होणार आहे. महापालिका विकास आराखड्यात असलेला हा १५ मीटर रूंदीचा रस्ता असून शेवटच्या टप्प्यात अवघा १०० मीटरचा रस्ता ताब्यात नाही.

त्यामुळे पौड रस्ता तसेच महात्मा सोसायटीला वळसा घालून जवळपास दोन किलोमीटर अंतर तसेच २५ ते ३० मिनिटे करावा लागणारा प्रवास आता अवघ्या पाच मिनिटांत होणार आहे.

पालिकेने लक्ष केंद्रित केलेल्या ३३ मिसिंग लिंक पैकी अजून एका मिसिंग लिंकचे काम चालू होऊन वाहन चालकांना एक महत्त्वाचा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी दिली. कोथरूड तसेच कर्वे पुतळ्याकडून वारजे तसेच चांदणी चौकाकडे जाण्यासाठी वाहनांना महात्मा सोसायटी अथवा पौड रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यातच, महात्मा सोसायटीचा रस्ता लहान असल्याने तर पौड रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्याने महापालिकेकडून काही वर्षांपूर्वी आशीष गार्डनपासून पुढे एकलव्य महाविद्यापर्यंत डीपी रस्ता विकसित करण्यात आला होता. तर, एकलव्य महाविद्यालयासमोरून महामार्गाकडे जाण्यासाठी आणखी ४०० मीटरचा प्रस्तावित होता. त्यात महामार्गाकडून सुमारे ३०० मीटर रस्त्याचे काम झालेले आहे.

शेवटच्या टप्प्यातील १०० मीटरचा रस्ता जागा ताब्यात नसल्याने बंद होता. त्यामुळे महापालिकेकडून “मिसिंग लिंक’ प्रकल्पाअंतर्गत हा रस्ता ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यानुसार जागामालकांकडून ताबा प्राप्त झाला असून सुमारे १०० मीटर लांबीचा व १५ मीटर रुंदीचा रस्ता विकसनाचे जे काम बंद पडले होते ते एक-दोन दिवसात सुरू होणार असून एकलव्य कॉलेज पासून थेट हायवे ला जाता येणे शक्य होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जकार्तात मोदींचे भव्य स्वागत; इंडो-पॅसिफिक दौऱ्याची दमदार सुरुवात व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि महत्त्वपूर्ण खनिजांवर...

0
जकार्ता | वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील तीन देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्याची सुरुवात इंडोनेशियातून केली. जकार्ता येथे पोहोचताच इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी...

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कामाकडे दुर्लक्ष; 70 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना नोटिसा

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दि. 6 जुलै : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR-2026) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम शिरपूर तालुक्यात...

राज्य उत्पादन शुल्क विभागातील बदल्यांवर संशयाचे सावट; मेडिकल ग्राउंड आणि ‘DPC’वरून खळबळ

0
मुंबई (प्रतिनिधी विशेष ): राज्य उत्पादन शुल्क विभागातील यंदाची बदली प्रक्रिया पारदर्शकतेऐवजी संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून, मेडिकल ग्राउंडचा आधार घेत सोयीच्या ठिकाणी बदली करून...

सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान ५ वर्षीय बालकाचा मृत्यू; पालकांकडून वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप, चौकशीची मागणी

0
सिरोंचा तालुका:(प्रतिनिधी जाबिर खान)सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पाच वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेनंतर पालकांनी वैद्यकीय...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला वेग ; प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे विशेष पुनरीक्षण अभियान प्रभावीपणे सुरू

0
गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ( एस . आय . आर . ) २०२६ अभियानाला बीड जिल्ह्यात...

error: Content is protected !!