शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे): मतदारांनी बीएलओंना सहकार्य करावे
मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक कर्मचारी अन लोकप्रतिनिधींची भूमिका ठरणार महत्त्वाची
शिरपूर- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार धुळे जिल्ह्यात (SIR 2026) मतदार यादींचे सखोल पुर्ननिरीक्षण कार्यक्रम सुरू झालेला आहे. म्हणुन शिरपूर तालुक्यातील मतदारांनी घरी येणार्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना आवश्यक कागदपत्रे देवून सहकार्य करणे आवश्यक आहे. जे मतदार EF Form भरून देणार नाहीत, त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणार नाही याची मतदारांनी नोंद घ्यावी असे आवाहन शिरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविल्यास ही मोहीम 100% यशस्वी होण्यास मदत मिळणार आहे.
मतदार यादींचे सखोल पुर्ननिरीक्षण
30 जुलै 2026 पर्यंत मुदत
भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील आदेशानुसार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार यादींचे सखोल पुर्ननिरीक्षण कार्यक्रम धुळे जिल्ह्यात (SIR 2026) सुरू झालेला आहे. त्या अनुषंगाने दिनांक 30/06/2026 ते 29/7/2026 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (B LO) आपल्या घरोघरी येऊन Enumeration Form वाटप व संकलित करणार आहे. त्यासाठी सर्व मतदारांनी आपला पासपोर्ट साईज फोटो व आवश्यक कागदपत्रे बीएलओ यांना द्यायची आहेत . जे मतदार EF Form भरून देणार नाहीत त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणार नाही याची नोंद घ्यावी.
प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची
या राष्ट्रीय कामासाठी सर्वांनी तात्काळ EF भरून राष्ट्रीय कामात सहकार्य करावे, या मोहिमेच्या जनजागृतीसाठी ग्राम पातळीवर तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी, सहा. कृषी अधिकारी व स्थानिक शासकीय यंत्रणासह प्रतिष्ठित नागरिक, आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी स्थानिक शिबीरात सहभागी व्हावे. समाजात विविध स्तरावर समुपदेशन, प्रबोधन करावे. या मोहिमेत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणुन त्यांनी सक्रिय सहभाग देत मतदान पुर्ननिरीक्षण कार्यक्रम (SIR) यशस्वी करावा असे आवाहन शिरपूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी, शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी , यांनी केले आहे.
सदर मोहिमे च्या ठिकाणी भामपूर, अंतुर्ली, वाघाडी या ठिकाणी तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी महेंद्र माळी यांनी BLO यांच्या कामाची तपासणी करून मार्गदर्शन केले आहे.






















