Homeताज्या बातम्यामतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कामाकडे दुर्लक्ष; 70 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना नोटिसा

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कामाकडे दुर्लक्ष; 70 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना नोटिसा

शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दि. 6 जुलै : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR-2026) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम शिरपूर तालुक्यात सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन Enumeration Form (EF) चे वाटप व संकलन करणे अपेक्षित आहे.

सदर काम दि. 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. तथापि, शिरपूर तालुक्यातील 70 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी अद्याप मतदारांना Enumeration Form (EF) चे प्रत्यक्ष अथवा ऑनलाइन वाटप केले नसल्याचे निदर्शनास आले आहे.

भारत निवडणूक आयोगाचा हा कार्यक्रम कालबद्ध स्वरूपाचा असून, संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे प्राथमिकदृष्ट्या आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित 70 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 मधील तरतुदीनुसार त्यांच्याविरुद्ध कार्यवाही का करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा मागविण्यासाठी लेखी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम हा लोकशाही प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी विहित मुदतीत जबाबदारीने काम पूर्ण करावे. तसेच मतदारांनीही Enumeration Form (EF) भरून आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

– उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, शिरपूर विधानसभा मतदारसंघ
– तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, शिरपूर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जकार्तात मोदींचे भव्य स्वागत; इंडो-पॅसिफिक दौऱ्याची दमदार सुरुवात व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि महत्त्वपूर्ण खनिजांवर...

0
जकार्ता | वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील तीन देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्याची सुरुवात इंडोनेशियातून केली. जकार्ता येथे पोहोचताच इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी...

राज्य उत्पादन शुल्क विभागातील बदल्यांवर संशयाचे सावट; मेडिकल ग्राउंड आणि ‘DPC’वरून खळबळ

0
मुंबई (प्रतिनिधी विशेष ): राज्य उत्पादन शुल्क विभागातील यंदाची बदली प्रक्रिया पारदर्शकतेऐवजी संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून, मेडिकल ग्राउंडचा आधार घेत सोयीच्या ठिकाणी बदली करून...

सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान ५ वर्षीय बालकाचा मृत्यू; पालकांकडून वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप, चौकशीची मागणी

0
सिरोंचा तालुका:(प्रतिनिधी जाबिर खान)सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पाच वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेनंतर पालकांनी वैद्यकीय...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला वेग ; प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे विशेष पुनरीक्षण अभियान प्रभावीपणे सुरू

0
गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ( एस . आय . आर . ) २०२६ अभियानाला बीड जिल्ह्यात...

भावपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी अहिल्यानगर पोलीसांच्या ताब्यात सुपूर्त

0
सिन्नर : प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर संस्थानातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला असून, नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील प्रवास पूर्ण...

error: Content is protected !!