Homeताज्या बातम्यापेपर ॲडवान्‍टेजकडून पुणे येथे अत्‍याधुनिक एआय उत्‍पादन टेक हब लाँच...

पेपर ॲडवान्‍टेजकडून पुणे येथे अत्‍याधुनिक एआय उत्‍पादन टेक हब लाँच…

पेपर ॲडवान्‍टेजकडून पुणे येथे अत्‍याधुनिक एआय उत्‍पादन टेक हब लाँच…
पुणे, ११ डिसेंबर २०२३ :- पेपर ॲडवान्‍टेज या आघाडीच्‍या जागतिक क्रेडिट इंटेलिजन्‍स, क्रेडिट मॅनेजमेंट आणि क्रेडिट इन्‍व्‍हेस्‍टमेंट कंपनीने भारतातील पुणे येथे अत्‍याधुनिक टेक हबचे उद्घाटन केले आहे. हे टेक हब आपल्‍या तंत्रज्ञान विकास प्रयत्‍नांना गती देण्‍यासाठी नाविन्यतेला चालना देण्‍याप्रती, तसेच एआयचा वापर करण्‍याप्रती कंपनीच्‍या कटिबद्धतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. भारतातील ३५ टक्‍क्‍यांहून अधिक वार्षिक दरासह विकसित होत असलेले फिनटेक क्षेत्र २०३० पर्यंत  १९० बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत (१५.८ लाख कोटी रूपये) पोहोचण्‍याची अपेक्षा असताना पेपर ॲडवान्‍टेजने या बाजारपेठेत आपले तंत्रज्ञान विकासांचे केंद्र स्‍थापित करण्‍याचा निर्णय घेतला आहे.
पूर्वी रिओम.एआई म्‍हणून ओळखला जाणारा एआय-संचालित क्रेडिट जोखीम व्‍यवस्‍थापन प्‍लॅटफॉर्म लोनगार्डच्‍या संपादनानंतर पेपर ॲडवान्‍टेज कार्यसंचालनांना केंद्रीकृत करत आपल्‍या जागतिक तंत्रज्ञान विकासामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. टेक हब विशेषत: लोन ओरिजिनेशन आणि सर्विसिंगदरम्‍यान जोखीम मूल्‍यांकनांसाठी नवीन क्रेडिट तंत्रज्ञान व विश्‍लेषणांना प्रगत करेल. पेपर अॅडवान्‍टेजचे अत्‍याधुनिक तंत्रज्ञान व अल्‍गोरिदम्‍स कर्जदारांना डेटा-संचालित निर्णय घेऊ देणाऱ्या सोल्‍यूशन्‍सची व्‍यापक श्रेणी उपलब्‍ध करून देत युनिफाईड प्‍लॅटफॉर्मसह सक्षम करते. कंपनीच्‍या डेटा व विश्‍लेषण सेवा लोन अंडररायटिंग प्रक्रियेदरम्‍यान फसवे डॉक्‍यूमेंट्स व आर्थिक फसवणूकींशी संबंधित जोखीम मोठ्या प्रमाणात कमी करण्‍यास मदत करतात.
५० संशोधक, प्रोग्रामर्स व  ॲनालिस्‍ट्सचा समावेश असलेली डायनॅमिक टीम टेक हबचा मूळ गाभा आहे. हे धोरणात्‍मक हब एआय-संचालित नाविन्‍यतेसाठी पॉवरहाऊस आहे, तसेच पेपर ॲडवान्‍टेजच्‍या तंत्रज्ञान विकासासाठी महत्त्वाचे केंद्र म्‍हणून सेवा देखील देते आणि भारत, इंडोनेशिया, मिडल ईस्‍ट आणि इतर आग्‍नेय आशियाई व युरोपियन बाजारपेठांमधील ग्राहकांना सेवा देणाऱ्या उत्‍पादनांना प्रगत करेल.

टेक हबच्‍या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत पेपर ॲडवान्‍टेजचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी फ्रेझर गेमेल म्‍हणाले की, ”२०२३ मधील आमच्‍या विकासाचे श्रेय ग्राहकांनी आमचे तंत्रज्ञान इनोव्‍हेशन आणि डेटा-संचालित सोल्‍यूशन्‍सना दिलेल्‍या महत्त्वाला जाते. टेक हबच्‍या लाँचसह आमच्‍या परिवर्तनात्‍मक प्रवासाला गती मिळाली आहे, ज्‍यामधून नवीन क्रेडिट तंत्रज्ञान विकसित करण्‍याप्रती आणि भारतातील भरभराट होत असलेल्‍या फिनटेक इकोसिस्‍टममध्‍ये मोठ्या प्रमाणात योगदान देण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”

या लाँचबाबत आपले मत व्‍यक्‍त करत पेपर ॲडवान्‍टेज इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी म्‍हणाले की, ”आम्‍हाला भारतात पेपर ॲडवान्‍टेजचे टेक हब असण्‍याचा आनंद होत आहे. लोनगार्डच्‍या संपादनापासून आम्‍ही भारतातील आमच्‍या ग्राहकवर्गामध्‍ये ४० टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे, तसेच एयूएममध्‍ये २०० टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली आहे. तंत्रज्ञान प्रगती आणि आमच्‍या फिनटेक क्षेत्राच्‍या झपाट्याने होत असलेल्‍या विकासामधून प्रेरित होत भारत लवकरच पेपर ॲडवान्‍टेजसह संपूर्ण विश्‍वासाठी तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धीमत्तेचे जागतिक हब बनेल.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

मालेगावच्या कुकाणे येथील शाळेत २६ लाखांचा प्रवेश घोटाळा; मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

0
Times Of Maharashtra Desk : मालेगाव जि.नाशिक शिक्षणाच्या पवित्र मंदिरात पैशांची मोठी लूट सुरू असल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून समोर...

error: Content is protected !!