निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम मुंडे (IAS), आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (FDA), महाराष्ट्र राज्य यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्पांनी प्रतीकात्मक अभिषेक करण्यात आला.

मा. तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळयुक्त दूध व अन्नपदार्थांविरोधात सुरू केलेल्या कठोर कारवाईचे स्वागत करत त्यांच्या प्रामाणिक, धाडसी आणि जनहिताच्या कार्याला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शासनाकडे अशी मागणी करण्यात आली की, मा. तुकाराम मुंडे साहेब यांची किमान तीन वर्षे अन्न व औषध प्रशासन (FDA) मधून बदली करू नये, जेणेकरून महाराष्ट्रातील भेसळविरोधी कारवाई अधिक प्रभावीपणे सुरू राहील आणि जनतेच्या आरोग्याचे संरक्षण होईल.
या कार्यक्रमास योगेश फकीरा गांगुर्डे, नितीन अशोक गांगुर्डे, गणेश माधव गांगुर्डे, स्वप्नील (गुड्डूभाऊ) गांगुर्डे, भारत तात्या गांगुर्डे, अशोक काका गांगुर्डे,दिलीप कुंडलिक बनकर, संतोष मेंबर गांगुर्डे, ज्ञानेश्वर पगारे, बाळासाहेब गायकवाड, विकी गांगुर्डे, धर्मा भाऊ जाधव, मनोज सासवडे, नितीन निवृत्ती आढाव, संतोष नामदेव गांगुर्डे, सुजल गांगुर्डे,सुनीलजी निकम (आहेरगाव), सुदर्शन गांगुर्डे, भाऊसाहेब सोळसे, अकबर भाई बेग, प्रशांत गांगुर्डे, रोहित गांगुर्डे, रुपेश पगारे, आकाश गांगुर्डे, संकेत गांगुर्डे, सचिन गांगुर्डे, रितेश गवई आणि यशवंतजी अहिरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी भेसळमुक्त महाराष्ट्र आणि जनतेच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या मोहिमेला आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला.






















