Homeताज्या बातम्याबापट हाॅस्पिटलमध्ये कॅन्सर रुग्णांना मिळणार निःशुल्क सुविधा ; पॅलिएटिव्ह केअर सेंटरचे झाले...

बापट हाॅस्पिटलमध्ये कॅन्सर रुग्णांना मिळणार निःशुल्क सुविधा ; पॅलिएटिव्ह केअर सेंटरचे झाले नुकतेच उद्घाटन…

बापट हाॅस्पिटलमध्ये कॅन्सर रुग्णांना मिळणार निःशुल्क सुविधा ;
पॅलिएटिव्ह केअर सेंटरचे झाले नुकतेच उद्घाटन…
पुणे :- धानोरी परिसरातील बापट मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये कॅन्सरच्या रुग्णांची योग्य ती काळजी घेण्यासाठी पॅलिएटिव्ह केअर युनिटचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या पॅलिएटिव्ह केअर युनिटमध्ये आलेल्या कॅन्सरच्या रुग्णांना राहण्याची व नर्सिंगची सेवा निःशुल्क मिळणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने डाॅक्टरांसाठी एक मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत शहरातील विविध भागांमधील फॅमिली डाॅक्टर्स उपस्थित होते.
या प्रसंगी कॅन्सर या आजाराविषय़ी विविध प्रकारची माहिती देण्यासाठी सुप्रसिद्ध आॅन्कोसर्जन डाॅ. प्रशांत चंद्रा यांच्यासह आॅन्को रेडिएशन तज्ञ डाॅ. अजिता चंद्रा आणि डाॅ. भूषण भळगट उपस्थित होते. या तज्ञ डाॅक्टरांनी मानवी शरीराच्या विविध अवयवांना होणारे कॅन्सरचे आजार, त्यांची लक्षणे, करावयाच्या विविध प्रकारच्या टेस्ट व घ्यावयाचे उपचार यासंबंधी पीपीटी प्रेझेंटेशन सह सविस्तर मार्गदर्शन दिले.

या वेळी डाॅ. रश्मी बापट यांनी सांगितले की, बापट मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या पॅलिएटिव्ह केंद्रात भर्ती होणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांना राहण्याची व नर्सिंगची सुविधा पूर्णपणे निःशुल्क असणार आहे. तसेच  कॅन्सर संदर्भात आगामी काळात जनजागृती करण्यासाठी बापट हाॅस्पिटल, इनोव्हिजन प्लस, अक्षर मानव, आम्ही शाश्वत आणि सक्षम संस्था यांच्या वतीने एक मोठे अभियान राबवले जाणार आहे.
या वेळी आई-बाबा मेडिकल फाउंडेशनच्या एमडी माधुरी पाठक  आणि सतीश पाठक यांचा तज्ञ डाॅक्टरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पॅलिएटिव्ह सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित सेमीनारला उपस्थित राहिलेल्या सर्व डाॅक्टरांना या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
याशिवाय उपस्थित सर्व डाॅक्टरांनी या वेळी बापट मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या पॅलिएटिव्ह सेंटरच्या बॅनरवर आपापली सही करून या हाॅस्पिटलच्या औपचारिक उद्घघाटनाला आपला योग्य पाठिंबा जाहीर केला.
या उद्घाटन कार्यक्रमाला आणि कॅन्सवरील सेमीनारला सिग्नोरा न्यूट्रिशन कंपनीच्या वतीने विशेष सहकार्य करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचे व्यवस्थापन व नियोजन इंनोव्हीजन प्लसचे डायरेक्टर व अक्षर मानवचे व्यापार व उद्योग विभाग प्रमुख परेश गांधी यांच्या नेतृत्वाखाली झाले तसेच इंनोव्हीजन प्लस व अक्षर मानव चे कार्यकारिणी सदस्य या वेळी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वृद्ध , दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी विशेष आधार सेवा शिबिर १३ व १४ जुलै...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)बीड ,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली , अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या नियंत्रणाखाली तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या...

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

error: Content is protected !!