Homeताज्या बातम्यामविआत जागावाटपावरुन तणाव, शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात काय म्हणाले ?

मविआत जागावाटपावरुन तणाव, शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात काय म्हणाले ?

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत सुक्ष्म तणाव निर्माण झाला असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली.

बाळासाहेब थोरात हे शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. पवारांच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतान महाविकास आघाडीत जागावाटपावरुन कोणताही तणाव नसल्याचे स्पष्ट केले आहे.

संजय राऊत आणि नाना पटोले यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे मविआत बिघाडी होणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळाला सतावत होता. त्यामुळे आता मविआच्या जागावाटपाच्या चर्चेसाठी राऊत-पटोले यांच्याऐवजी बाळासाहेब थोरात आणि अनिल देसाई यांना पुढे करण्यात आले आहे का, असा प्रश्न थोरात यांना विचारण्यात आला. यावर बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, आमच्यापैकी कोणीतरी एक नेता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना भेटणार होता. मात्र, रमेश चेन्नीथला यांनी मला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे जायला सांगितले. शरद पवार आणि माझी चर्चा चांगली झाली. आता काही थोड्या जागांवर निर्णय बाकी आहे. यामधून लवकरच मार्ग निघेल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

मविआत जागावाटपाची चर्चा सुरु आहे. मात्र, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. प्रत्येक पक्षाला आग्रह धरण्याचा अधिकार आहे. कारण मविआतील तिन्ही पक्षांकडे चांगले उमेदवार आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी प्रत्येक पक्षाकडून आग्रह धरला जात आहे. यामध्ये कोणताही वाद नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरेंची भेट घेणार

शरद पवारांच्या निवासस्थानावरुन निघाल्यानंतर बाळासाहेब थोरात आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाणार आहेत. आम्ही जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत. बहुतांश जागांवर निर्णय झाला आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. दोन-तीन पक्ष एकत्र असतात तेव्हा अशा अडचणी येतात. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची बातमी खोटी आहे. महाविकास आघाडीत गोंधळ निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत. मात्र, त्यामध्ये काहीही तथ्य नाही, हे ग्रामीण भागातील साध्या व्यक्तीलाही कळेल, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NEET नंतर आता MAHA TET पेपरफुटीचा स्फोट; उद्याची परीक्षा तात्काळ रद्द

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे ....

कारवाईचं आश्वासन… पण अजूनही कृती नाही! पुणे पोलीस भरतीतील ₹21 हजार वसुली प्रकरणात नेमकं...

0
पुणे पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कथितपणे ₹21 हजार रुपये उकळल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने सातत्याने लावून धरला आहे. सुरुवातीला हा केवळ आरोप...

ट्रॅक्टरच्या डिझेल पाईपमधून इंधन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर

0
राजगड (मध्य प्रदेश): निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात घडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना जमिनीवर पडलेली डिझेलची...

महा टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलली; ठाण्यात तपासाला वेग

0
मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) २८ जून रोजी होणार होती. मात्र ठाणे जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा...

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...

error: Content is protected !!