Homeताज्या बातम्याKasba Peth Vidhan Sabha : भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसने जिंकला; आगामी निवडणुकीत कोण...

Kasba Peth Vidhan Sabha : भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसने जिंकला; आगामी निवडणुकीत कोण मैदान मारणार?

पुणे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, २०१९ च्या पोटनिवडणुकीने याला छेद दिला. या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला होता.

आगामी निवडणुकीत काँग्रेस गेल्या विजयाची पुनरावृत्ती करणार की भाजप पुन्हा आपला गड राखणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या मतदारसंघात आतापर्यंत दोन महिलांना आमदार म्हणून संधी मिळाली आहे.

कसबा पेठ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. यापूर्वी २८ वर्षांपासून या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. १९९५ पासून २०१९ पर्यंत गिरीश बापट पाचवेळा आणि २०१९ मध्ये मुक्ता टिळक निवडून आल्या होत्या. मात्र, २०२३ मध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसकडून माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत धंगेकर यांनी विजय मिळविला होता. धंगेकर यांना ७३ हजार ३०९ मते, तर रासने यांना ६२ हजार २४५ मते मिळाली होती. धंगेकर यांनी रासने यांच्यावर १० हजार ९१५ मताधिक्य मिळविले होते.

कसबा मतदारसंघाची निर्मिती १९७२ मध्ये झाली होती. त्यात काँग्रेसच्या लीलाबा व्यापारी यांनी काँग्रेसकडून विजय मिळविला होता. त्यानंतर १९७८ मध्ये अरविंद लेले हे जेएनपीच्या तिकिटावर आमदार झाले होते. मात्र, त्यानंतर १९८० मध्ये अरविंद लेले यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून मतदारसंघावर झेंडा रोवला होता. १९८५ मध्ये हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे गेला. या निवडणुकीत उल्हास काळोखे यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर १९९० मध्ये कसबा पुन्हा भाजपकडे आला. त्यात भाजपच्याच अण्णा जोशी यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर १९९५ पासून भाजपचे गिरीश बापट हे सलग पाचवेळा भाजपकडून निवडून आले होते. २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या मुक्ता शैलेश टिळक यांना ७५,४९२ मते मिळाली होती. त्याचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अरविंद शिंदे यांना ४७,२९६ मते मिळाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गोंडवाना विद्यापीठाच्या कला महोत्सवात ने.हि. महाविद्यालयाचा झेंडा; समूहगीत व एकलगीतात प्रथम

0
रुपेश देशमुख  ( ब्रह्मपुरी प्रतिनिधी ) : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत प्राध्यापकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कला महोत्सव स्पर्धेत ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी...

हिंगणे बु. येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

0
विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) :  जामनेर तालुक्यातील हिंगणे बु. येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने “पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळा” उत्साहात पार...

नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी २२ हजार कोटींच्या विकासकामांना मंजुरी

0
 विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : मुंबई – नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन,...

भगवान श्रीकृष्णांचे दिव्य विचार आत्मसात करून जीवनाचे सार्थक करावे – हभप प्रल्हाद महाराज येवले

0
विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) : गेवराई तालुक्यातील विविध पांडुरंग देवस्थानाच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त ९ ते १६ मार्च दरम्यान श्रीमद भागवत...

रायसीना इंग्लिश स्कूलचे दहावे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात, मुलांना बालवयातच चांगले संस्कार द्या – एपीआय...

0
विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) :  प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांकडे वेळीच लक्ष देवून आपल्या मुलांना बालवयातच चांगले संस्कार द्यावेत तसेच मुलांनी एआय तंत्रज्ञानाचा...

error: Content is protected !!