Homeताज्या बातम्याSameer Bhujbal : छगन भुजबळांच्या घरात बंडखोरी, समीर भुजबळांनी निवडला वेगळा रस्ता!

Sameer Bhujbal : छगन भुजबळांच्या घरात बंडखोरी, समीर भुजबळांनी निवडला वेगळा रस्ता!

समीर भुजबळ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा देत समीर भुजबळ यांनी विद्यमान आमदार सुहास कांदेंविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

समीर भुजबळ २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे महायुतीचीच मते विभागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

समीर भुजबळ नांदगाव मनमाड विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. छगन भुजबळ यांनी एक ट्विट करत तसे संकेत दिले होते. अखेर त्यावर समीर भुजबळ यांनी शिक्कामोर्तब केले.

मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा

सुहास कांदे हे विद्यमान आमदार असल्याने महायुतीमध्ये ही जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गेली. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी प्रयत्न केले. पण, उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांनी २४ ऑक्टोबर रोजी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

समीर भुजबळ नांदगाव विधानसभा निवडणूक लढवणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर करतानाच समीर भुजबळ यांनी नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले.

“मी आज अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानतो. त्यांनी मला मुंबईत काम करण्याची संधी दिली. मी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा तिन्ही नेत्यांना पाठवला आहे”, असे समीर भुजबळ म्हणाले.

“येणाऱ्या २८ ऑक्टोबर रोजी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहे. भयमुक्त नांदगाव हे मिशन हाती घेऊन अर्ज भरणार आहे”, असे म्हणत समीर भुजबळ यांनी सुहास कांदेंविरोधात निवडणूक लढवण्याचे जाहीर केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा...

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा 36 वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दीपक भाऊ निकाळजे...

पूरग्रस्त गोदाकाठचे पंचनामे करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)   गोदाकाठमध्ये पुरामुळे सर्वच शेतकरी व सायखेडा, चांदोरीतील दुकानदारांचे तसेच रहिवासी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने पंचनामे...

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

error: Content is protected !!