Homeमहाराष्ट्र‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ उपक्रमातून जि.प. शाळांना नवी उभारी

‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ उपक्रमातून जि.प. शाळांना नवी उभारी

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभागाने ‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. गावागावांत जनजागृती करत पालकांशी थेट संवाद साधून विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यावर भर दिला जात आहे.

या उपक्रमांतर्गत अधिकारी व शिक्षक वाड्या-वस्त्यांमध्ये जाऊन पालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आहेत. विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना प्रवेशासाठी प्रोत्साहन दिले जात असून विविध जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत.

नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात करण्यासाठी विशेष उपक्रम आखण्यात आले आहेत. बैलगाडीतून मिरवणूक काढून प्रवेशोत्सव साजरा केला जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि बूट देऊन पालकांवरील आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शाळांमध्ये स्वच्छ वर्गखोल्या, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, क्रीडा साहित्य आणि शैक्षणिक साधनांची उपलब्धता वाढवली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व आनंददायी वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर दिला जात आहे.

शिक्षण विभागाच्या या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांबद्दल पालकांचा विश्वास वाढेल आणि शासकीय शाळांकडे पुन्हा कल वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मध्यान्ह भोजन योजना, शिष्यवृत्ती, डिजिटल शिक्षण आणि ई-लर्निंग सुविधा यांचाही लाभ विद्यार्थ्यांना मिळत असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ या उपक्रमातून तालुक्यात व्यापक जनजागृती होत असून अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NEET नंतर आता MAHA TET पेपरफुटीचा स्फोट; उद्याची परीक्षा तात्काळ रद्द

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे ....

कारवाईचं आश्वासन… पण अजूनही कृती नाही! पुणे पोलीस भरतीतील ₹21 हजार वसुली प्रकरणात नेमकं...

0
पुणे पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कथितपणे ₹21 हजार रुपये उकळल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने सातत्याने लावून धरला आहे. सुरुवातीला हा केवळ आरोप...

ट्रॅक्टरच्या डिझेल पाईपमधून इंधन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर

0
राजगड (मध्य प्रदेश): निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात घडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना जमिनीवर पडलेली डिझेलची...

महा टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलली; ठाण्यात तपासाला वेग

0
मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) २८ जून रोजी होणार होती. मात्र ठाणे जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा...

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...

error: Content is protected !!