Homeताज्या बातम्याकोट्यवधी देऊन वसतिगृहांमध्ये असुविधा असतील, तर ठेकेदारांवर कारवाई ; संजय शिरसाट

कोट्यवधी देऊन वसतिगृहांमध्ये असुविधा असतील, तर ठेकेदारांवर कारवाई ; संजय शिरसाट

पुणे : समाजकल्याण विभागांतर्गत असलेल्या काही वसतिगृहांची स्थिती अत्यंत बिकट आहे. वसतिगृहाचा कंत्राटदार कोण आहे, कोणत्या राजकीय पक्षाशी किंवा नेत्या – मंत्र्याशी संबंधित आहे हे न पाहता, सुविधा न देणाऱ्या ठेकेदारांविरोधात थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिला.

शिरसाट यांनी पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरातील २५० क्षमतेच्या मुलींच्या शासकीय वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पुण्यातील वसतिगृहातील पाहणी केली असताना काही वसतिगृह चांगली आहेत, तर काही वसतिगृहांची सुधारणा करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

यापुढे शिरसाट म्हणाले, ‘संभाजीनगर येथील वसतिगृहाची अवस्था पाहिली, तर अंगावर काटा येईल, अशी परिस्थिती आहे. अनेक वसतिगृहांमध्ये स्वच्छतागृह नाहीत. स्वयंपाकगृह गलिच्छ आहेत. मूलभूत सुविधांचा अभाव आहे. दारे – खिडक्या तुटक्या अवस्थेत असून, सुरक्षेची वानवा आहे. बहुतांश ठिकाणी अशीच अवस्था असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व वसतिगृहांची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी प्रत्यक्षात जाऊन पाहणी करण्यात येणार आहे. कोट्यवधी रुपये देऊन वसतिगृहांमध्ये असुविधा असतील, तर ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल.’

‘समाजकल्याण खात्यातर्फे विद्यार्थ्यांना योग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. काही वसतिगृहांमध्ये उणिवा निश्चितच आहेत. मात्र, अधिकाऱ्यांना दुरुस्ती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच खात्यामार्फत कोणती कामे प्रलंबित आहेत, याची माहिती घेण्यात आली असून, तातडीने कार्यवाही करण्यात येईल,’ असे शिरसाट यांनी स्पष्ट केले. यावेळी समाजकल्याण मार्फत बार्टीचे कामकाज चालते. बार्टीच्या कामाविषयी आणि वसतिगृहातील विद्यार्थांच्या समस्या याबाबत सामाजिक संघटनांनी यावेळी समाजकल्याण मंत्री यांना निवेदनही दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त गेवराईत रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): दि.२० महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे....

आषाढी एकादशी : वाळूज पंढरपूर यात्रेसाठी ‘स्वच्छ वारी’चा संकल्प; ३४२० स्वयंसेवक, ६५ CCTVची व्यवस्था

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड):  दि.२० वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता व...

जंतर मंतर दिल्ली येथे सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनास दौंड मधून...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड येथे दौंड शहरातील नागरिकांनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात...

 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) – महत्त्वाची सूचना SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार SET परीक्षा जी पूर्वी ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. ✅...

आदर्शगाव वंजारवाडीचा अनोखा उपक्रम! हरिपाठातील बालकांसह ग्रामस्थांना सरपंच वैजिनाथ नाना तांदळे यांच्याकडून निशुल्क पंढरपूर...

0
३५ वर्षांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आणखी एक सामाजिक परंपरा; भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश पंढरपूर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) बीड तालुक्यातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्शगाव वंजारवाडीने सामाजिक,...

error: Content is protected !!