Homeताज्या बातम्यादिल्लीहून रात्री १० वाजताचे एअर इंडियाचे विमान पुण्याला सकाळी १० ला पोहोचले...

दिल्लीहून रात्री १० वाजताचे एअर इंडियाचे विमान पुण्याला सकाळी १० ला पोहोचले…

पुणे : – शनिवार रात्री दिल्लीहून पुण्याला एअर इंडियाची फ्लाईट होती. परंतू, कंपनीने सात तास प्रवाशांना विमानातच बसवून ठेवले होते. यानंतर तांत्रिक बिघाड म्हणून सांगत पहाटे दोन तासांसाठी खाली उतरवून बसमध्ये फिरवून पुन्हा विमानतळावर नेले व त्याच विमानात बसवून रविवारी सकाळी पुण्याला पाठवून दिल्याचे समोर आले आहे.

हा सर्व प्रकार दाट धुक्यामुळे झाल्याचे समजते आहे. एवढा वेळ विमानात बसवून ठेवल्याने वयस्कर प्रवाशांसह अनेकांना मानसिक आणि शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.

दिल्ली-पुणे एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाईटमध्ये २०० प्रवासी होते. दोन तासांत ते पुण्यातही उतरणार होते. परंतू विमानाने उड्डाणचे केले नाही. तास दोन तास गेल्यानंतर प्रवाशांनी क्रू मेंबरना विचारणा केली तर तेव्हा त्यांना धुक्यामुळे विमान उडाले नसल्याचे व लवकरच उड्डाण करणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे प्रवासी शांत राहिले परंतू पुन्हा तासभर उलटल्यावर प्रवाशांना आता आपण काही पुण्याला जाण्यासाठी निघत नसतो याची जाणीव झाली होती.

विमानात बसवून ठेवण्याऐवजी आम्हाला विमानतळावर न्या अशी प्रवाशांनी मागणी केली होती. परंतू कंपनीने यावर काहीही हालचाल केली नाही. यामुळे सुमारे सात तास प्रवासी विमानातच अवघडलेल्या स्थितीत बसून होते. अखेर पहाटे साडे पाच वाजता प्रवाशांना विमानातून उतरण्यास सांगण्यात आले. त्यांना बसमध्ये बसवून पुन्हा विमानतळावरच घिरट्या घातल्या गेल्या. यानंतर काही काळाने त्यांना नवीन टर्मिनलवर पाठविण्यात आले व तिथे सुरक्षा तपासणी करण्यास सांगण्यात आले.

विमानतळावर आधीच अनेक विमाने लेट झाल्याने प्रवाशांची गर्दी झाली होती. त्यात या प्रवाशांची अबाळ झाली. यात या प्रवाशांचे दोन तास गेले, यानंतर सकाळ उजाडताच या प्रवाशांना त्याच विमानात बसवून पुण्याला पाठवून देण्यात आले. अशा प्रकारे या प्रवाशांचा दिल्ली-पुणे प्रवास सुमारे १२ तासांचा झाला. रात्री ९.४० मिनिटांनी निघणारे हे विमान सकाळी १० वाजता पुणे विमानतळावर पोहोचले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!