जळगाव (प्रतिनिधी : विनोद सुधाकर पवार): महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशाबद्दल मुंबई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना गौरविण्यात आले. यावेळी मंत्री आशिष शेलार उपस्थित होते.
भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) मार्फत या कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्यात आले. जळगाव जिल्हा प्रशासनाने २०० पैकी तब्बल १८८ गुण मिळवत राज्यात अव्वल स्थान मिळवले. प्रशासनातील पारदर्शकता, डिजिटल कामकाजाची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकाभिमुख सेवा यामुळे जिल्ह्याने हे यश संपादन केले.
या यशामागे सात महत्त्वाची सूत्रे निर्णायक ठरली. त्यामध्ये अधिकाऱ्यांसाठी स्पष्ट उद्दिष्टे व मूल्यमापन, ‘आपले सरकार’ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय कामकाजात ई-ऑफिसचा १०० टक्के वापर, कामकाजाच्या देखरेखीसाठी डिजिटल डॅशबोर्ड, नागरिकांसाठी व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे सेवा, एआय व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर तसेच जीआयएस प्रणालीद्वारे योजनांची अंमलबजावणी या बाबींचा समावेश आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, “हे यश जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांचे फलित आहे. नागरिकांना जलद, पारदर्शक व प्रभावी सेवा देण्याच्या उद्दिष्टाने आम्ही सातत्याने काम केले. जिल्हा प्रशासनाचे हे यश संपूर्ण जळगावकरांना समर्पित आहे.”
जळगाव जिल्ह्याच्या या यशामुळे प्रशासनिक कार्यक्षमता आणि डिजिटल परिवर्तनातील प्रगती अधोरेखित झाली असून, राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी हा एक आदर्श ठरत आहे.
ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हा राज्यात अव्वल : रोहन घुगे यांचा मुंबईत गौरव
RELATED ARTICLES
- Advertisment -
कर्तव्यावर असताना जवान सचिन राठोड यांचे आजाराने निधन; गंगाखेड तालुक्यात शोककळा
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : गंगाखेड तालुक्यातील भूमिपुत्र आणि भारतीय सैन्यात कर्तव्य बजावणारे जवान सचिन राठोड (वय 31) यांचे आजाराने निधन झाले. ही दुर्दैवी...
गेवराई पोलिसांची स्मार्ट कामगिरी! बंपरच्या तुकड्यावरून अपघातातील आरोपी जेरबंद
गेवराई प्रतिनिधी (विष्णू गायकवाड) : तपासातील सूक्ष्म निरीक्षण आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर गेवराई पोलिसांनी हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपीचा शोध लावत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. केवळ...
३८ वर्षांनी पुन्हा भरली शाळा; गेवराईत माजी विद्यार्थ्यांचा भावनिक स्नेहमिलन सोहळा
गेवराई : प्रतिनिधी (विष्णु गायकवाड) : पुन्हा ती शाळा, पुन्हा ती घंटा, पुन्हा तो वर्ग, या आठवणींना उजाळा देत गेवराई येथील १९८८-८९ बॅचच्या माजी...
दौंडचा अभिमान! डॉ. बबन माने यांना वाणिज्य विषयात पीएच.डी.
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड ) : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत दौंड येथील डॉ. बबन सुरेश माने यांनी आपल्या कर्तृत्वाने नवा मानाचा तुरा रोवला...
अवकाळी पावसाचा शिरपूर तालुक्याला मोठा फटका
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका तब्बल 30 गावांना...