गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): उन्हाळ्यामध्ये इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटना अनेकदा घडतात. गत काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असून, अकोला शहराचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनचालकांनी काळजी घेण्याची गरज आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरली जाणारी ‘लिथियम-आयन’ बॅटरी उष्णतेसाठी अत्यंत संवेदनशील असते. उन्हाळ्यात बाहेरील तापमान ४० ते ४५ अंशांच्या पार जात असताना बॅटरीचे अंतर्गत तापमानही वाढते. अशावेळी चार्जिंगमध्ये केलेली थोडीही चूक जीवावर बेतू शकते.
कुठे बॅटरीचा स्फोट, तर कुठे शॉर्टसर्किटमुळे आग
४५ मिनिटे बॅटरी थंड होऊ द्या.
उन्हाळ्यात लिथियम-आयन बॅटरीमधील सेल्स जास्त तापतात. यामुळे बॅटरीचा स्फोट होणे किंवा वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत.
तालुक्यात हजारो ईव्ही, सर्वाधिक दुचाकी
प्रदूषणमुक्त प्रवासासाठी ईव्हीकडे कल वाढल्याने तालुक्यात सध्या हजारो इलेक्ट्रिक वाहने धावत आहेत. यात सर्वाधिक संख्या दुचाकींची आहे. स्वस्त इंधन आणि आकर्षक डिझाइनमुळे नागरिक ईव्हीला पसंती देत असले तरी, सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते.
चार्जिंग करताना काय घ्यावी काळजी?
प्रवास करून आल्यावर बॅटरी गरम असते. अशावेळी लगेच चार्जिंगला लावू नका. किमान ४५ मिनिटे बॅटरी थंड होऊ द्या. शक्यतो कार किंवा दुचाकी सावलीतच चार्ज करा. थेट सूर्यप्रकाश बॅटरीचे तापमान वाढवतो.
पूर्ण डिस्चार्ज वा रात्रभर चार्जिंग धोकादायक
बॅटरीची लेव्हल ५ ते १० टक्क्यांपर्यंत खाली येऊ देऊ नका. तसेच रात्रभर बॅटरी चार्जिंगला लावून ठेवणे अत्यंत धोकादायक आहे. बॅटरी १०० टक्के चार्ज झाल्यावर चार्जर स्वयंचलितपणे बंद होतो, असे म्हटले जात असले तरी, उन्हाळ्यात ओव्हरहिटिंगचा धोका कायम असतो.
ओरिजिनल चार्जर वापर, पॉवर एक्स्टेंशन टाळा
कंपनीने दिलेल्या मूळ चार्जरचाच वापर करा. स्वस्त किंवा दुसऱ्या कंपनीचा चार्जर बॅटरीच्या ‘बीएमएस’ला हानी पोहोचवू शकतो. ईव्हीसाठी जास्त पॉवर लागते. घरातील साध्या एक्स्टेंशन बोर्डमुळे शॉर्टसर्किट होऊन आगी लागण्याचे प्रमाण मोठे आहे असे
न्यू श्री साई ऑटो इलेक्ट्रिशन स्पेअर पार्ट डिस्ट्रीब्यूटर तुळशीराम मोहरकर यांनी सांगितले






















