Homeमहत्त्वाचेनाशिक नगरीत लवकरच महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

नाशिक नगरीत लवकरच महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

गेवराई(प्रतिनिधी विष्णू गायकवाड समाज): प्रतिबिंब बहुद्देशीय संस्था, बी एस एफ बहुद्देशीय संस्था, संत कबीर संस्था व उपेक्षित नायक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक नगरीमध्ये बी एस एफ बहुद्देशीय संस्था व समाज प्रतिबिंब बहुद्देशीय संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा पुरस्कार सोहळा मे महिन्यात नाशिक नगरीत चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थिती मध्ये पार पडणार आहे. सामाजिक, कला, राजकीय, शिक्षण, पर्यावरण, पत्रकारिता, उद्योग, क्रीडा, व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लोकांना महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आहे अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भूषण सरदार यांनी दिली आहे. या पुरस्कारासाठी प्रस्ताव स्वीकारणे सुरु असून आपला प्रस्ताव ९४२०६२१९९४ या नंबर वर पाठवावा.
महाराष्ट्रातील केवळ ७० लोकांना महाराष्ट्र नायक या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम वर्षभर सुरु असतात. यावेळी संस्थेच्या वतीने वृद्धाश्रम बांधण्याचा संकल्प आहे. लोकांच्या सन्मानातून वृद्धाश्रम उभं व्हावं या निमित्ताने व उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भूषण सरदार यांनी दिली. हा पुरस्कार सोहळा आगळावेगळा व दिमाखदार पद्धतीने व्हावा त्याचबरोबर आलेल्या सर्व पुरस्कारार्थीचा यथोचित मानसन्मान व्हावा यासाठी महाराष्ट्र नायक पुरस्कार सोहळा आयोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नायक पुरस्कार सोहळा आयोजन समिती याप्रमाणे
वरीष्ठ पत्रकार रामभाऊ आवारे निफाड, पत्रकार मुकुंद आव्हाड सारोळे थडी, जेष्ठ पत्रकार डॉ. शाम जाधव नाशिक, महिला पत्रकार व उत्कृष्ट निवेदिका अश्विनी पुरी नाशिक रोड, पत्रकार विष्णू गायकवाड (बीड ) सामाजिक कार्यकर्त्या सौ राजनंदिनी अहिरे नाशिक रोड, गिरजा प्रतिष्ठानच्या सौ वैशाली सोनवणे सटाणा, कवयित्री व उत्कृष्ट निवेदिका कु. अश्विनी सांगळे येवला, शिक्षिका सौ प्रीती म्हसदे नाशिक, शंकरराव कन्हेरकर शिंगणापूर, संजय पाटील पत्रकार संजय बच्छाव, डॉ. रावसाहेब घोडेराव, योगिता (अकोला), शिक्षक दादाराव सुखदाने, पत्रकार रोशन गव्हाणे नाशिक, शिक्षक सोपान वाघमारे आदींचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!