Homeक्राईमManikrao kokate: “माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी; राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव”

Manikrao kokate: “माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी; राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव”

Times of Maharashtra Desk:  राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे मंत्री कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.मंगळवारी नाशिक उच्च न्यायालयाने सदानिका घोटाळा प्रकरणातील कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला होता. या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या निर्णयानंतर याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

न्यायालयाने अर्जावर युक्तिवाद ऐकल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने आदेश दिला की, कोकाटेंनी त्वरीत पोलिसांसमोर हजर होणे आवश्यक आहे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करणे आवश्यक आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, “कायद्यापुढे सर्व लोक समान आहेत, मग तो मंत्री असो किंवा इतर कोणताही नागरिक.”यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी अटक वॉरंट टाळण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला. वकिल मनोज पिंगळे यांनी सहानुभूतीने विचार करण्याची विनंती केली. मात्र, आजच्या सुनावणीतही कोकाटेंनी स्वतःची हजेरी लावली नाही. वकिलांनी माणिकराव सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत असे सांगितले; परंतु त्याची कोणतीही कागदपत्रे न्यायालयात सादर केलेली नाहीत. याचिकाकर्त्या वकिल आशुतोष राठोड यांनी कोकाटेंवर आरोप केला की, ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत असल्याचा दावा करीत अटक टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्रकरणाचा इतिहास

सदानिका घोटाळा प्रकरण 30 वर्षांपूर्वी सुरू झाले. माणिकराव कोकाटे यांनी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. त्यांच्या भावाला विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने यांच्यासह कॅनडा कॉर्नर भागातील व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठी सदनिका मिळाल्या होत्या. तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी केली होती.प्रथम वर्ग न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना आणि त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड ठोठावला होता. याविरोधात माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात अपील केली होती. परंतु मंगळवारी उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवल्याने कोकाटेंच्या अडचणी वाढल्या आहेत.राज्याचे राजकारण आता तणावाखाली आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता अजित पवार माणिकराव कोकाटेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!