Homeताज्या बातम्याBMC Election, Thackeray Brothers Alliance : मुंबई महापालिका निवडणूक : ठाकरे बंधूंच्या...

BMC Election, Thackeray Brothers Alliance : मुंबई महापालिका निवडणूक : ठाकरे बंधूंच्या युतीसमोर मोठी आव्हाने

Times of Maharashtra Desk: देशातील सर्वात मोठी महापालिका असलेली मुंबई पुन्हा एकदा जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सक्रिय झाले असून शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यातील जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दोन्ही पक्षांची युती होणार असून त्याची अधिकृत घोषणा बुधवारी केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उत्तर भारतीय मतदारांचा कल भाजपकडे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आपल्या बाजूने कसे वळवता येतील, यासाठी ठाकरे बंधूंना ठोस रणनीती आखावी लागणार आहे.

महाविकास आघाडीबाबत अद्याप अस्पष्टता. 

ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी ही युती महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार की स्वतंत्रपणे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. काँग्रेसने आधीच एकटे लढण्याची घोषणा केल्यामुळे दलित आणि मुस्लिम मतांची बेगमी करणे हे ठाकरे बंधूंसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

ठाकरे बंधूंसमोरील प्रमुख आव्हाने

बंडखोरी रोखणे : ज्या प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांची ताकद आहे आणि जिथे उमेदवारीवरून दावा आहे, तिथे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सोबत ठेवत बंडखोरी टाळावी लागणार आहे.

मराठी मतदारांचे एकत्रीकरण : मराठी बहुल प्रभागांमध्ये अधिकाधिक मराठी मतदार आपल्या बाजूने कसे वळतील, यासाठी विशेष लक्ष द्यावे लागेल. मराठी मतदार महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाकडे मोठ्या प्रमाणात जाणार नाहीत, यासाठीची रणनीती महत्त्वाची ठरणार आहे.

दलित आणि मुस्लिम मतदार : काँग्रेस सोबत नसल्यामुळे दलित आणि मुस्लिम मतदारांची विभागणी होण्याची शक्यता आहे. याचा फटका ठाकरे बंधूंच्या युतीला बसू नये, यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी राजकीय गणित मांडावे लागणार आहे.

मित्र पक्षांना स्थान : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या मित्र पक्षाला सन्मानजनक जागा देऊन त्यांचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारीही युतीवर असेल.

उत्तर भारतीय मतदारांचे गणित : महायुतीत विशेषतः भाजपकडे असलेली उत्तर भारतीय मतदारांची ताकद लक्षात घेता, ही मतं आपल्या बाजूने वळवायची की त्याविरोधात मराठी मतदारांचे एकत्रीकरण करायचे, यावर स्पष्ट रणनीती ठरवावी लागेल.

एकवाक्यता आणि वचननामा : महापालिका निवडणुकीसाठी मुद्दे ठरवताना आणि संयुक्त वचननामा जाहीर करताना दोन्ही पक्षांच्या नेतृत्वामध्ये एकवाक्यता राखणे व ती प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवणे हेही मोठे आव्हान असणार आहे.

एकंदरीत, मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती चर्चेत असली तरी राजकीय समीकरणे, मतदारांचे विभाजन आणि स्थानिक पातळीवरील आव्हाने यांचा सामना करतच त्यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरावे लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मातीशी नाळ जपणारा अधिकारी ; जरुडमध्ये तहसीलदार शेळकेंनी धरले हाती औताचे रूमने

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): प्रशासन केवळ कार्यालयाच्या चार भिंतीत मर्यादित न राहता ते थेट जनतेच्या दारी पोहोचले तरच त्याला खऱ्या अर्थाने लोकाभिमुख स्वरूप प्राप्त...

गुन्हे अन्वेषण विभागात बदली आदेश धाब्यावर?

0
पुणे : गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), महाराष्ट्र राज्य, पुणे येथील अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी होऊनही संबंधित कर्मचारी अद्याप मूळ ठिकाणीच कार्यरत असल्याचे समोर...

वन विभागात नेमका ‘आका’ कोण? बदलीनंतरही मिरा केंद्रे जुन्याच ठिकाणी

0
पुणे: वनवृत्तातील वनपाल संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या बदल्यांबाबत आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वनसंरक्षक (प्रादेशिक), पुणे कार्यालयाने जारी...

एरंडोल तालुक्यातील ६०० ब्रास वाळूसाठा प्रकरण पुन्हा चर्चेत तहसील कार्यालयाच्या अहवालामुळे प्रशासनात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार) :एरंडोल तालुक्यातील ६०० ब्रास वाळूसाठा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून तहसीलदार कार्यालयाने सादर केलेल्या अहवालामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. संबंधित...

जळगाव येथे कोळी महासंघाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवांना जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने तसेच सरसकट देण्यासंदर्भात शासनाने तातडीने परिपत्रक जारी करावे,...

error: Content is protected !!