Homeताज्या बातम्याThackeray Alliance :शिवतीर्थ साक्षीला! बाळासाहेबांचे वारसदार एकत्र, राज–उद्धवांची युती जाहीर

Thackeray Alliance :शिवतीर्थ साक्षीला! बाळासाहेबांचे वारसदार एकत्र, राज–उद्धवांची युती जाहीर

Time of Maharashtra Desk: मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झालेली दिसत आहे. ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अखेर जाहीर झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली ही युती बुधवारी वरळीतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अधिकृतरीत्या घोषित करण्यात आली.
या ऐतिहासिक क्षणा आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते. या दृश्याने कार्यकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.

“ज्यांचं महाराष्ट्रावर आणि मुंबईवर प्रेम आहे, त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं.” – राज ठाकरे यांची ठाम घोषणा

पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “शिवसेना–मनसेची युती झाली आहे, हे मी अधिकृतपणे जाहीर करतो.” माझ्या एका मुलाखतीतील ‘महाराष्ट्र कोणत्याही भांडणापेक्षा मोठा आहे’ या विधानातूनच या युतीची सुरुवात झाली, असे त्यांनी स्पष्ट केले. जागावाटपाबाबत बोलताना त्यांनी मिश्किल टोला लगावत सांगितले की, “सध्या राजकारणात मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत, त्यामुळे उमेदवारीबाबत योग्य वेळी माहिती दिली जाईल.त्यानंतर ” राज ठाकरे यांनी जनतेला थेट आवाहन करत सांगितले,“ज्यांचं महाराष्ट्रावर आणि मुंबईवर प्रेम आहे, त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं.”
तसंच त्यांनी ठामपणे सांगितले की, “मुंबईचा महापौर मराठीच असेल आणि तो आमचाच असेल.”

“भाजपला मुंबईचे लचके तोडायचे आहेत. आता आम्ही भांडत राहिलो, तर संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान होईल.” – उद्धव ठाकरे यांचा आक्रमक इशारा

यावेळी उद्धव ठाकरे यांनीही जोरदार भाषण करत भाजपवर थेट हल्ला चढवला आहे. “भाजपला मुंबईचे लचके तोडायचे आहेत. आता आम्ही भांडत राहिलो, तर संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान होईल.” म्हणून ही युती कर्तव्य आणि कायमस्वरूपी एकत्र राहण्यासाठी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. “मुंबई किंवा महाराष्ट्राकडे जो कोणी वाकड्या नजरेने पाहील, त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
मराठी माणसाला उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, “आता चुकाल तर संपल. मराठीचा वसा टाकू नका.”

सात महानगरपालिकांमध्ये एकत्र लढणार
ठाकरे बंधूंच्या या युतीमुळे मुंबईसह सात महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणं बदलणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून, महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ठाकरे युग’ पुन्हा जोरात परतल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता मुंबई आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी ही युती किती निर्णायक ठरणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!