Homeताज्या बातम्याबॅरिकेडिंग नाही, चेतावणी नाही; पुण्यातील विकासकामे नागरिकांसाठी धोक्याची घंटा...

बॅरिकेडिंग नाही, चेतावणी नाही; पुण्यातील विकासकामे नागरिकांसाठी धोक्याची घंटा…

बॅरिकेडिंग नाही, चेतावणी नाही; पुण्यातील विकासकामे नागरिकांसाठी धोक्याची घंटा

“कंत्राटदार बेफाम, अधिकारी गाफील; पुण्यात Safety Compliance ची उघड पायमल्ली”

पुणे :- शहरातील विकासकामे आता थेट नागरिकांच्या जीवावर उठली आहेत का, असा संतप्त सवाल उपस्थित झाला असून जुना मोटर स्टँड चौक ते अलंकार मेडिकल दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात ख्वाजा गरीब नवाज एंटरप्राइजेस या कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा उघडपणे समोर आला आहे. या ठिकाणी काम सुरू असताना आवश्यक असलेली कोणतीही सुरक्षा मानके पाळण्यात आलेली नसून, पुणे महानगरपालिकेच्या कामाच्या आदेशातील स्पष्ट अट क्रमांक १४ अर्थात Safety Compliance ची अक्षरशः पायमल्ली करण्यात येत आहे.

कामाच्या ठिकाणी विद्युत वायरी, केबल्स, साहित्य आणि अन्य धोकादायक वस्तू उघड्यावर टाकण्यात आलेल्या असून, कोणतीही संरक्षक व्यवस्था करण्यात आलेली नाही. अधिक धक्कादायक बाब म्हणजे याच परिसरात लहान मुले खेळत असल्याचे फोटो उपलब्ध झाले आहेत. अशा परिस्थितीत एखादा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी ना बॅरिकेडिंग, ना चेतावणी फलक, ना सुरक्षारक्षक, अशा अवस्थेत नागरिक विशेषतः लहान मुले थेट मृत्यूच्या दारात उभी असल्याचे चित्र आहे.

ख्वाजा गरीब नवाज एंटरप्राइजेस या कंत्राटदारांकडून बेफाम आणि बेजबाबदारपणे काम सुरू असून, अपघात झाला तर संपूर्ण जबाबदारी कंत्राटदाराची असल्याचे करारनाम्यात स्पष्ट असतानाही, त्याकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येत आहे. हे केवळ निष्काळजीपणाचे उदाहरण नसून, नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ करण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, एवढा गंभीर प्रकार सुरू असतानाही पुणे महानगरपालिकेचे संबंधित अभियंते, अधिकारी आणि पर्यवेक्षक यांचे या कामाकडे लक्ष नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असताना, त्यातील किमान सुरक्षिततेच्या अटीही पाळल्या जात नसतील, तर हा विकास आहे की व्यवस्थेचा ऱ्हास, असा प्रश्न पुणेकर विचारू लागले आहेत. करारात नमूद असलेल्या अटींचे उल्लंघन होत असतानाही जर मनपा प्रशासन डोळेझाक करत असेल, तर ही बाब केवळ कंत्राटदारापुरती मर्यादित न राहता थेट अधिकाऱ्यांच्या कर्तव्यच्युतीकडे निर्देश करते.

जर या ठिकाणी एखादा गंभीर अपघात झाला, एखाद्या लहान मुलाला इजा झाली किंवा जीवितहानी झाली, तर त्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी कंत्राटदारासह संबंधित मनपा अधिकाऱ्यांवरही येणार आहे. मात्र अपघात घडल्यानंतर चौकशी आणि कारवाई करण्यापेक्षा, आधीच नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

पुणे शहरात विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेला जर अशा प्रकारे तिलांजली दिली जात असेल, तर हे काम थांबवून तातडीने चौकशी करावी, संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि जागरूक पुणेकरांकडून होत आहे. अन्यथा, हा प्रश्न केवळ वृत्तपत्रांच्या पानांपुरता न राहता थेट न्यायालयाच्या दालनात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!