Homeताज्या बातम्यादौंड नगरपालिका निवडणूक: राष्ट्रवादीकडे नगराध्यक्षपद, नागरिक हित संरक्षण मंडळाचा १७ जागांवर विजय....

दौंड नगरपालिका निवडणूक: राष्ट्रवादीकडे नगराध्यक्षपद, नागरिक हित संरक्षण मंडळाचा १७ जागांवर विजय….

नगरसेवक वसीम शेख ठरले जायंट किलर
२६ नगरसेवकांत २,२८४ मते मिळवत घेतले लीड

Times of Maharashtra Desk, Pune: नुकत्याच पार पडलेल्या दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्तासमीकरणांचा आश्चर्यकारक खेळ पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांनी नगराध्यक्षपद मिळविले असले, तरी नागरिक हित संरक्षण मंडळ व मित्रपक्षांनी तब्बल १७ जागांवर विजय मिळवत महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे बहुमत जनता देत असतानाही सत्ता हातातून निसटली अशा चर्चा शहरात सुरू आहेत.

या सत्तासंघर्षामागे स्थानिक राजकारणातील प्रमुख नेते प्रेमसुख कटारिया यांची दीर्घकाळ टिकून असलेली पकड पुन्हा अधोरेखित झाल्याचे बोलले जात आहे. यंदा भाजपने निवडणुकीची सूत्रे आमदार राहुल कुल यांच्या हातात दिली होती, त्यांनी संघटनात्मक स्तरावर प्रयत्न केले. मात्र अंतर्गत मतभेद आणि क्रॉस व्होटिंगमुळे निकालात फरक पडल्याचे राजकीय वर्तुळात सूर उमटत आहेत.

दरम्यान, प्रभाग क्रमांक १ मध्ये घडलेला प्रसंग विशेष चर्चेत आहे. नागरिक हित संरक्षण मंडळाकडून उमेदवारी मिळालेल्या अॅड. महेश गोपीनाथ नवगिरे यांना प्रचारादरम्यान मोठा राजकीय दबाव सहन करावा लागल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. विरोधकांनी काढलेल्या मोर्चामुळे लोकशाही मूल्यांचा भंग झाल्याचा आरोप नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

नवीन चेहरा असलेल्या नवगिरे यांनी अनुभवी प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध लढा देत १००४ मते मिळवत आपली ताकद दाखवली. तथापि, त्यांच्या विरोधात झालेल्या राजकीय हालचालींमुळे त्यांचा पराभव झाल्याची भावना समर्थकांमध्ये दिसून आली.

आता नवगिरे यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी द्यावी, अशी मागणी काही ठिकाणी होताना दिसत आहे. प्रेमसुखजी कटारिया आणि आमदार राहुल कुल यांनी निवडणुकीतील निकालाचा आदर राखत जनतेच्या मतांचा सन्मान करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, वसीम शेख यांनी विक्रमी मतांनी मिळवलेला विजय सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. तब्बल २,२८४ मतांची आघाडी घेत त्यांनी २६ नगरसेवकांमध्ये सर्वाधिक मते मिळवत ताकद दाखवून दिली आहे. निवडणूकपूर्व सर्व अंदाज फोल ठरवत शेख यांनी थेट बालेकिल्ल्यावरच विरोधकांचा पराभव केला असल्याने त्यांना जायंट किलर अशी उपाधी मिळत आहे.

त्यांच्या मागे उभा राहिलेला तरुण कार्यकर्त्यांचा मोठा जनसमुदाय आणि मतदारांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, पुढील राजकारणात वसीम शेख यांची भूमिका अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या संपूर्ण निवडणुकीतून दौंडच्या स्थानिक राजकारणातील ध्रुवीकरण आणि सत्तेसाठी होणारा संघर्ष स्पष्टपणे समोर आला आहे. निवडणूक संपली असली तरी पुढील काही दिवस दौंडच्या राजकारणात चुरस कायम राहण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला अटक

0
Times Of Maharashtra Desk पुणे : सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका २७ वर्षीय तरुणाला अटक करून त्याच्याकडून घातक शस्त्रे जप्त केली आहेत....

संतोष भंडारी , केशव पंडितांच्या अटकेसाठी

0
गेवराई तालुका (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  ठेवीदार कलेक्टर व एसपी कार्यालयात धडकले गेवराई, दि.१८(प्रतिनिधी )_ १६ एप्रिल रोजी गेवराई येथील विविध क्रेडिट सोसायटी व...

आवळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात;५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप,

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज...

सुशी येथे ३९ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

0
 गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  तालुक्यातील सुशी येथे आयोजित ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी श्रीक्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प....

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

error: Content is protected !!