Homeमहाराष्ट्रआवळगाव व पिंपळगाव येथे 'महाराजस्व समाधान शिबीर' उत्साहात; ५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे...

आवळगाव व पिंपळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात; ५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबवले जात आहे. याच अभियानांतर्गत १७ एप्रिल २०२६ रोजी पिंपळगाव (आवळगाव परिसर) येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या एकाच शिबिरातून ५२६ लाभार्थ्यांना विविध दाखले आणि प्रमाणपत्रांचे वाटप करून महसूल प्रशासनाने आपली गतिमानता सिद्ध केली आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रम्हपुरीचे तहसीलदार सतिश मासाळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि कार्यक्षम करण्यासाठी हे अभियान मैलाचा ठरेल. नागरिकांना चकरा न मारता एकाच ठिकाणी सर्व शासकीय सेवा मिळाव्यात आणि कोणत्याही पात्र व्यक्ती लाभापासून वंचित राहू नये, हाच शासनाचा आणि प्रशासनाचा मुख्य हेतू आहे.”

या शिबिराला नायब तहसीलदार लीना बोबाटे, नायब तहसीलदार महानंदा मडावी, दुय्यम निबंधक जयंत मडावी आणि ग्रामसेवक प्रदीप तलमले यांची प्रशासकीय उपस्थिती होती. तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर जसे की, भाजपा युवा जिल्हा सरचिटणीस तनय देशकर, तालुका सरचिटणीस अविनाश म्हस्के, संदीप आष्टेकर, सरपंच प्रितम बाबनवाडे आणि उपसरपंच गुरुदेव वाघरे उपस्थित होते.

शिबिरात जवळपास ६०० ते ७०० नागरिकांनी सहभाग नोंदवला. केवळ दाखल्यांचे वाटपच नव्हे, तर नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींवर चर्चा करून त्यांचे जागेवरच समाधान करण्यात आले. महसूल विभागाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे ग्रामीण भागातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!