Homeताज्या बातम्यातरुणाने इंस्टाग्रामवर ओळख वाढवून केला तरुणीवर अत्याचार; तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल

तरुणाने इंस्टाग्रामवर ओळख वाढवून केला तरुणीवर अत्याचार; तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल

सातारा तरुणाने इंस्टाग्रामवर ओळख वाढवून केला तरुणीवर अत्याचार; तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल…

सातारा : इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या १७ वर्षीय तरुणीवर एका तरुणाने विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

विशाल बाळकृष्ण अवघडे (वय ३५, रा. कुमठे, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी १७ वर्षांची असून, विशाल आणि तिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. या ओळखीतून विशालने पीडितेला त्याच्या दुचाकीवर बसवून साताऱ्यातील विविध ठिकाणी फिरवले. तसेच पाटखळ येथील एका लाॅजवर गोड बोलून नेऊन तिच्यावर त्याने बलात्कार केला.

हा प्रकार २६ ऑक्टोबर २०२३ रोजी घडला. मात्र, घाबरलेल्या पीडित तरुणीने या घटनेची कोठेही वाच्यता केली नाही. ती घरात शांत राहत असल्याने आईने तिची विचारपूस केली असता घडलेला प्रकार तिने आईला सांगितला. त्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात पीडित तरुणीने तक्रार दाखल केली. संशयित आरोपी विशाल अवघडे याला अद्यापपर्यंत अटक झाली नव्हती. सहायक पोलिस निरीक्षक पालवे हे अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

समाधान लॉजवर पोलिसांचा छापा; अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

0
दौंड( प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दि. ३० जुलै : दौंड तालुक्यातील मौजे गिरीम येथील वायरलेस फाटा, दौंड–पाटस रोडलगत असलेल्या 'समाधान लॉज' येथे दौंड पोलिसांनी...

शिरपूर तालुक्यातील आदर्श गाव अंतर्गत राज्याचे माजी सचिव जयंत भाटिया यांची जातोडा येथे भेट

0
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर विधान परिषद मतदार संघाचे आमदार मा. अमरीश भाई पटेल व शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष मा. भूपेश भाई...

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिणींच्या शुभहस्ते शुभारंभ

0
बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे जयसिंग पंडित यांचे आवाहन गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि.३० (प्रतिनिधी) जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने गेवराई शहरात १०० खाटांचे अत्याधुनिक आरोग्य सुविधांसह...

एक कॉल, आणि तात्काळ सेवा; ब्रह्मपुरी पोलिसांचे ‘डायल ११२’चे आवाहन.

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी वाढती गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अधिक हायटेक झाले आहे. नागरिकांना कोणत्याही संकटसमयी...

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

error: Content is protected !!