Times of Maharashtra Desk, Pune: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ – नाना पेठ मध्ये राजकीय वातावरण तापले आहे. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शाहबाज खान यांनी उमेदवारी स्वीकाल्याने ही लढत लक्षवेधी ठरणार असल्याचे चित्र आहे.
तरुण आणि काम करणारे नेतृत्व
शाहबाज खान हे प्रभागात तरुण, तडफदार आणि सामाजिक कार्यातून घडलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. लहानपणापासूनच सामाजिक कार्याची परंपरा त्यांना घरातून मिळाली आहे. गरजू नागरिकांसाठी मदतीचा हात, युवकांसाठी प्रेरणादायी उपक्रम, तसेच स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे. यामुळेच ‘काम करणारा आणि लोकांमध्ये वावरणारा उमेदवार’ अशी प्रतिमा त्यांनी नागरिकांच्या मनात निर्माण केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची अधिकृत उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शाहबाज खान यांना अधिकृत उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या प्रचाराला वेग आला असून, कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. विकास, विश्वास आणि सेवा या त्रिसूत्रीवर त्यांचा निवडणूक प्रचार केंद्रित असून, प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.
प्रभाग २३ मध्ये चुरशीची लढत
प्रभाग क्रमांक २३ मध्ये यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून या प्रभागात पुढील उमेदवार रिंगणात आहेत
अ : अनिकेत कोठावळे
ब : सोनाली वनराज आंदेकर
क : लक्ष्मी उदयकांत आंदेकर
ड : शाहबाज खान
दरम्यान, या प्रभागात सध्या एक नारा चर्चेचा विषय ठरत आहे
वनराज भाऊ की सुनो, ४ घड्याळ चुनो
शाहबाज खान यांना मिळणार कामाचा फायदा?
स्थानिक प्रश्नांची सखोल जाण, तरुणाईशी थेट संवाद आणि सामाजिक कामाचा अनुभव या जोरावर शाहबाज खान यांना निवडणुकीत कितपत फायदा होतो, याकडे आता संपूर्ण प्रभागाचे लक्ष लागले आहे.
या सर्व पातळ्यांवर आघाडी घेतल्याने शाहबाज खान यांचे पारडे जड झाले आहे.






















