Homeताज्या बातम्यासरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या बिअर शॉपीविरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी दौंड पोलीस स्टेशनकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात सायंकाळी मोठ्या प्रमाणात महिला, मुली, विद्यार्थीनी व ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते. भाजी मंडई तसेच ट्युशनसाठी ये-जा करणाऱ्या महिलांना व मुलींना काही समाजकंटकांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करून महिलांकडे पाहणे, टिप्पणी करणे, अश्लील हावभाव करणे, आरडाओरडा करणे व सार्वजनिक शांततेचा भंग करणे असे प्रकार घडत असल्याने परिसरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे.

तसेच या परिसरात राजरोसपणे मटका जुगार व ऑनलाईन चक्री गेमच्या माध्यमातून जुगार सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून त्यामुळे संशयित व्यक्तींची वर्दळ वाढल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

याशिवाय परिसरातील एका बिअर शॉपीचा व्यवसाय नियमीत वेळेपेक्षा अधिक काळ, रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मद्यधुंद व्यक्तींची गर्दी वाढून गोंधळ, शिवीगाळ, वाहनांचा आवाज व सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी, महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अवैध मटका व ऑनलाईन जुगार चालविणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी तसेच संबंधित बिअर शॉपीच्या परवान्याची तपासणी करून नियमभंग आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!