Homeताज्या बातम्याकोंढव्याच्या रणांगणात 'रणरागिणी'ची चर्चा; काँग्रेसच्या उमेदवार तहेझीब सिद्दीकी यांना मिळतोय अभूतपूर्व जनसागर!

कोंढव्याच्या रणांगणात ‘रणरागिणी’ची चर्चा; काँग्रेसच्या उमेदवार तहेझीब सिद्दीकी यांना मिळतोय अभूतपूर्व जनसागर!

प्रभाग क्र. १९ ‘ड’ मध्ये प्रचाराचा धुरळा; महिला उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नागरिक.

Times of Maharashtra Desk : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, कोंढवा येथील प्रभाग क्रमांक १९ ‘ड’ मध्ये काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार तहेझीब सिद्दीकी यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. एक सुशिक्षित, संवेदनशील आणि कार्यक्षम ‘महिला उमेदवार’ म्हणून तहेझीब सिद्दीकी यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा असून, त्यांना मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

निवडणूक रिंगणात अनेक उमेदवार असले तरी, सिद्दीकी यांच्या प्रचारफेऱ्यांमध्ये दिसणारा नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लक्ष वेधून घेणारा आहे. “केवळ आश्वासन नको, तर ठोस काम करणारी उमेदवार हवी,” या भूमिकेतून नागरिक सिद्दीकी यांचे स्वागत करत आहेत.

महिला शक्तीचा एल्गार राजकारणात महिलांचा सहभाग केवळ नावापुरता नसून, प्रत्यक्ष कामातही त्या कशा आघाडीवर असू शकतात, याचे उत्तम उदाहरण तहेझीब सिद्दीकी यांनी घालून दिले आहे. एक महिला उमेदवार असल्याने प्रभागातील महिला भगिनींशी त्यांचा थेट संवाद होत आहे. घरोघरी प्रचारासाठी जाताना महिलांकडून त्यांचे औक्षण केले जात असून, आमच्या प्रश्नांची जाण असणारी हक्काची ताई, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

कोंढव्याचा विकास आणि महिला सक्षमीकरण हेच माझे ध्येय आहे. मला मिळणारे प्रेम आणि आशीर्वाद हेच माझे भांडवल आहे. प्रभागातील प्रत्येक नागरिक हा माझ्या कुटुंबाचा भाग असून, त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. – तहेझीब सिद्दीकी

कामाच्या जोरावर मतदारांची पसंती तहेझीब सिद्दीकी यांच्या आजवरच्या सामाजिक कामाची पोचपावती त्यांना प्रचारादरम्यान मिळत आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि भविष्यातील विकासाचा दृष्टिकोन यामुळे त्या विरोधकांपेक्षा उजव्या ठरत आहेत. प्रभागातील रस्ते, पाणी आणि स्वच्छता यांसारख्या प्रश्नांवर त्यांनी मांडलेली भूमिका मतदारांना भावली आहे.

ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि तरुणांचा उत्साह प्रचार रॅली दरम्यान ज्येष्ठ नागरिक स्वतःहून पुढे येऊन सिद्दीकी यांना आशीर्वाद देत आहेत. तर दुसरीकडे, तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्यासोबत निष्ठेने काम करताना दिसत आहे. मतदारांकडून मिळणारे प्रेम, आपुलकी आणि विश्वास यामुळे ही निवडणूक केवळ एका उमेदवाराची नसून, ती सर्वसामान्य जनतेची निवडणूक झाल्याचे चित्र प्रभाग १९ ‘ड’ मध्ये निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!