Times Of Maharashtra Desk : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी सुरू पहिल्या कलानुसार महायुती आघाडीवर राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी आज सकाळपासून सुरू झाली आहे. शनिवारी पार पडलेल्या मतदानात जिल्हा परिषदांच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी मतदान झाले होते. या निवडणुकांमध्ये एकूण 7,438 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा यात समावेश आहे.
जिल्हा परिषद निकालांचे प्राथमिक कल
731 जिल्हा परिषद सदस्यांपैकी आतापर्यंत 200 जागांचा कल स्पष्ट झाला असून, त्यात महायुती आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
सकाळी 11 वाजेपर्यंतची आकडेवारी पुढीलप्रमाणे—
भाजप – 70
शिवसेना (शिंदे गट) – 38
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 43
काँग्रेस – 21
शिवसेना (ठाकरे गट) – 14
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – 3
इतर – 11
कोकणात महायुतीची बिनविरोध मुसंडी
कोकण विभागात महायुतीने मोठी आघाडी घेत तब्बल 27 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 8 तर पंचायत समितीत 17 जागा महायुतीच्या उमेदवारांनी बिनविरोध जिंकल्या आहेत.
50 सदस्यसंख्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे 7 आणि शिंदे गटाचा 1 सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. तसेच 100 सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समितीत भाजपचे 16 आणि शिंदे शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झाला आहे.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतूनही शिवसेनेचे प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
महाड पंचायत समितीतील सवाने-धामणे गणातून उभे असलेले अनिल जाधव हे विरोधकांनी शेवटच्या दिवशी माघार घेतल्याने बिनविरोध विजयी झाले.
तर रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज पंचायत समिती गणातून शिंदे शिवसेनेच्या डॉ. पद्मजा कांबळे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
दरम्यान, मतमोजणी अद्याप सुरू असून पुढील तासांत अंतिम निकाल स्पष्ट होणार आहेत.






















