Homeमहत्त्वाचेसोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष!

सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष!

Times Of Maharashtra Desk : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून, सोलापूर जिल्हा परिषदेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेसाठी एकूण 68, तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले असून, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी उमेदवार दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे.

मोहोळमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) आघाडीवर

मोहोळ तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार विजयराज डोंगरे यांनी पहिल्याच फेरीत आघाडी घेतली आहे.
तसेच आष्टी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमित व्यवहारे हे विजयी झाले आहेत.

माळशिरसमधील प्रतिष्ठेच्या लढतीत भाजप आघाडीवर

माळशिरस तालुक्यातील प्रतिष्ठेच्या दहिगाव जिल्हा परिषद गटात भाजपच्या संस्कृती राम सातपुते यांनी आघाडी घेतली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे विद्यमान आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर हे पिछाडीवर आहेत.

महूद गटात शिवसेनेचा विजय

महूद जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे दादा लवटे हे विजयी झाले आहेत. तर पंचायत समितीमधून बाळासाहेब बंडगर आणि सोनाली पाटील हे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. या विजयामुळे शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे.

सोलापूर जिल्हा परिषद – प्रमुख विजयी उमेदवार

  • करमाळा (11 जागा)

    • रश्मी बागल (भाजप) – पांडे गट

  • माळशिरस

    • संस्कृती सातपुते (भाजप) – दहिगाव गट

  • दक्षिण सोलापूर

    • नेताजी खंडागळे (भाजप) – बोरमणी जिल्हा परिषद गट

  • अक्कलकोट

    • शांभवी कल्याणशेट्टी (भाजप) – चपळगाव जिल्हा परिषद गट

इतर तालुक्यांतील निकाल हळूहळू स्पष्ट होत असून मतमोजणी अद्याप सुरू आहे.

दरम्यान, पंचायत समितीच्या 136 जागांचे निकालही टप्प्याटप्प्याने जाहीर होत असून पुढील काही तासांत सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!