Homeमनोरंजन"फुला" १७ एप्रिलपासून चित्रपटगृहात झळकणार; 'फुला'तून उलगडणार मुरळीची संघर्षमय कथा!

“फुला” १७ एप्रिलपासून चित्रपटगृहात झळकणार; ‘फुला’तून उलगडणार मुरळीची संघर्षमय कथा!

Times Of Maharashtra Desk : अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षमय कथा आगामी ‘फुला’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचं पोस्टर खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या हस्ते लाँच करण्यात आले याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते , दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थितीत होती. हा चित्रपट येत्या १७ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे

पै. अजित शिवाजी जाधव यांनी “फुला” या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.अभिषेक जावीर दिग्दर्शित या चित्रपटाची पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या समाधान ऐवळे यांनी या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. अमर देवकर यांनी सर्जनशीर दिग्दर्शन, रवीकिरण जावीर, समाधान ऐवळे यांनी गीतलेखन, प्रताप जोशी यांनी छायांकन, अतुल लोखंडे यांनी कला दिग्दर्शन, राहुल प्रजापती यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. वेशभूषा कोमल जावीर, अक्षता पाटील तर रंगभूषा समाधान भोरे यांची आहे. गायिका वैशाली सामंत, वैशाली माडे, गायक रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली इंगवले, वैष्णवी अदोडे, आकाश नवगिरे यांनी चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे. प्रियांतिका, आरोही गडदे, मंजुषा खेत्री, संतोष शिंदे, देवा गाडेकर, रविकिरण जावीर, सनी कदम, छाया आदट, शरद लांडगे या नव्या दमाच्या कलाकारांचा उत्तम अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण आणि टीम ही आटपाडी गावातील असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

“फुला” ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षमय कथा आहे. तमाशा फड, जागरण गोंधळ या पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही गोष्ट महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतून आकार घेते. चित्रपटाविषयी दिग्दर्शक अभिषेक जावीर म्हणाले, “फुला” हा चित्रपट म्हणजे केवळ एका मुलीची शोकांतिका नाही, तर तो महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांमध्ये अ़डकलेल्या स्त्री कलाकारांच्या अस्तित्त्वाचा जीवंत दस्तावेज आहे. मुरळी परंपरेत अनेक स्त्रियांना कधीही त्यांची स्वप्नं, हक्क, प्रेम, सन्मानाने जगण्याची संधी मिळत नाही. समाज त्यांची कला घेतो, पण त्यांना माणूस म्हणून जगू देत नाही. वास्तवाचं प्रामाणिकपणे चित्रण करण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!