Homeताज्या बातम्याविशेष मुलांच्या रंगपंचमीमध्ये उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा उत्स्फूर्त सहभाग

विशेष मुलांच्या रंगपंचमीमध्ये उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा उत्स्फूर्त सहभाग

Times Of Maharashtra Desk : पुणे  रंगपंचमीच्या निमित्ताने भोई प्रतिष्ठान तर्फे आयोजित ३१ वा रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. पुणे शहरातील अनाथ मुले, मूकबधिर विद्यार्थी, रस्त्यावरील गरजू मुले तसेच अंध विद्यार्थ्यांसमवेत दरवर्षीप्रमाणे यंदाही हा रंगोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी उपस्थित राहून विशेष मुलांबरोबर रंगांची उधळण केली.

कार्यक्रमादरम्यान मुलांनी एकमेकांना विविध रंग लावत आनंद साजरा केला. भगवा, निळा, हिरवा, गुलाबी, पिवळा, नारंगी अशा विविध रंगांनी संपूर्ण परिसर रंगून गेला होता. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पाहून उपस्थितांचे मन भारावून गेले.

यावेळी बोलताना उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणाले, “उपमहापौर म्हणून मला या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आणि या सर्व मुलांबरोबर रंगपंचमी खेळण्याची संधी लाभली, हे माझे भाग्य आहे. या चिमुकल्यांनी प्रेमाने मला रंग लावला. जसे हे विविध रंग एकत्र येऊन सुंदर चित्र तयार करतात, तसेच आपला भारत देश आणि आपले संविधान विविधतेने नटलेले आहे. अनेक जाती-धर्म, परंपरा आणि संस्कृती यांची सांगड घालत आपण एकात्मतेचा संदेश देत आहोत.”

कार्यक्रमात विविध सामाजिक संस्थांनी नाश्ता, पाणी व जेवणाची व्यवस्था केली होती. विशेष म्हणजे एका मुस्लिम कुटुंबीयांनी शिरकुरमा आणून सणात सहभाग नोंदवला. विविध धर्म व समाजघटक एकत्र येऊन हा रंगोत्सव साजरा करत असल्याचे चित्र पाहून सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा सुंदर संदेश देण्यात आला.

या रंगोत्सवात सहभागी होताना लहानपणच्या आठवणी ताज्या झाल्याची भावना व्यक्त करत वाडेकर म्हणाले की, “जे मुले रंगांपासून वंचित राहतात, त्यांच्यासोबत होळी खेळण्याची आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरता आले, याचा खरा समाधान आहे.

या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, स्टॅंडिंग कमिटी चेअरमन श्रीनाथ भिमाले, उद्योजक कृष्णकुमार गोयल तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे प्र-कुलगुरू पराग कळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विंचूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण अभिवादन

0
विंचूर (प्रतिनिधी उत्तम जाधव, योगेश कर्डिले) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विंचूर येथे...

लासलगाव व चांदवड आंदोलनानंतर नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये बदल : आता बाजार समितीमध्येही खरेदीला...

0
लासलगाव निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : 4 जून 2026, लासलगाव व चांदवड येथे शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला...

निळवंडे कालव्याच्या वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करा : खासदार राजाभाऊ वाजे

0
सिन्नर, प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) – सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द आणि वारेगाव या गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी...

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम

0
जळगाव, दि. ३ जून (प्रतिनिधी) – टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या,...

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी.

0
देऊगाव (प्रतिनिधी बबनराव नागरे): दिनांक 3 जून 2026 रोजी भगवान बाबा चौक चिखली रोड देऊळगाव राजा येथे सर्व धर्मीय व स्मारक समिती ग्रुप...

error: Content is protected !!