Homeताज्या बातम्याGR असूनही ग्रामपंचायत कर्मचारी व अंगणवाडी सेविकांना मानधन नाही; ‘हक्काचे पैसे तात्काळ...

GR असूनही ग्रामपंचायत कर्मचारी व अंगणवाडी सेविकांना मानधन नाही; ‘हक्काचे पैसे तात्काळ द्या’ची मागणी

विनोद पवार (जळगाव  प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या कठीण काळात गावपातळीवर जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासन निर्णयानुसार देय असलेले प्रोत्साहनपर मानधन अद्याप मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे. शासनाने काढलेल्या GR नुसार संबंधित कर्मचाऱ्यांना दरमहा ₹2000 प्रमाणे 23 महिन्यांचे मानधन देण्याचे निर्देश दिले होते. मात्र अनेक ठिकाणी हा लाभ प्रत्यक्षात पोहोचलेला नाही, अशी तक्रार आहे.

कोविड-19 च्या काळात या कर्मचाऱ्यांनी निर्जंतुकीकरण मोहीम, जनजागृती, क्वारंटाईन व्यवस्थापन, आरोग्य विभागाला सहकार्य, तसेच विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. विशेषतः अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी घराघरांत जाऊन आरोग्यविषयक समन्वय साधत मोठे योगदान दिले होते.

या सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने विशेष मानधन जाहीर केले असले, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

संबंधित विभागाने शासन परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करून सर्व पात्र ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना त्यांचे हक्काचे मानधन तत्काळ द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. कोरोनासारख्या संकटात निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान राखण्यासाठी शासनाने जाहीर केलेला लाभ लवकरात लवकर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!