Homeआरोग्यरोहन ओव्हाळ खून प्रकरणाचा मास्टरमाईंड जेरबंद; मार्केटयार्ड पोलिसांची ६ तासांत धडाकेबाज कारवाई

रोहन ओव्हाळ खून प्रकरणाचा मास्टरमाईंड जेरबंद; मार्केटयार्ड पोलिसांची ६ तासांत धडाकेबाज कारवाई

Times Of Maharashtra Desk : शहरात खळबळ उडवून देणाऱ्या प्रसिद्ध रॅपर आणि रील स्टार रोहन कांतीलाल ओव्हाळ याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने शिताफीने सापळा रचून अवघ्या सहा तासांत मुख्य आरोपी कौशल कमलेश लांडगे (वय २०, रा. हडपसर) याला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?
दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी पहाटे ४:४५ च्या सुमारास गंगाधाम चौक परिसरात रोहन ओव्हाळ याची पेव्हर ब्लॉकने डोक्यात मारून आणि धारदार शस्त्राने गंभीर जखमा करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांचा थरारक पाठलाग
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या मदतीने तपास सुरू केला. आरोपी कौशल लांडगे हा सराईत गुन्हेगार असल्याने तो वारंवार आपले लोकेशन बदलून पोलिसांना गुंगारा देत होता.

शेवटी, तो स्वारगेट येथील डायस प्लॉट झोपडपट्टीतील एका पत्र्याच्या शेडमागे लपल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी परिसराला वेढा घातला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दबा धरून बसलेल्या पोलीस अंमलदार बालाजी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

अल्पवयीन साथीदारांनाही घेतले ताब्यात
या गुन्ह्यात कौशल लांडगे याच्यासोबत सहभागी असलेल्या इतर दोन विधिसंघर्षित बालकांना (अल्पवयीन साथीदार) देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.

या पथकाने केली कारवाई
ही धडाकेबाज कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त मिलींद मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनीता नवले, उपनिरीक्षक सुनील भापकर, तसेच राजेश थोरात, कौस्तुभ जाधव, किरण जाधव, महिबूब नदाफ, गोरख चिनके, बालाजी शिंदे, दिनेश माने, संदीप सुर्यवंशी आणि आशिष यादव या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

समाधान लॉजवर पोलिसांचा छापा; अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

0
दौंड( प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दि. ३० जुलै : दौंड तालुक्यातील मौजे गिरीम येथील वायरलेस फाटा, दौंड–पाटस रोडलगत असलेल्या 'समाधान लॉज' येथे दौंड पोलिसांनी...

शिरपूर तालुक्यातील आदर्श गाव अंतर्गत राज्याचे माजी सचिव जयंत भाटिया यांची जातोडा येथे भेट

0
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर विधान परिषद मतदार संघाचे आमदार मा. अमरीश भाई पटेल व शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष मा. भूपेश भाई...

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिणींच्या शुभहस्ते शुभारंभ

0
बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे जयसिंग पंडित यांचे आवाहन गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि.३० (प्रतिनिधी) जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने गेवराई शहरात १०० खाटांचे अत्याधुनिक आरोग्य सुविधांसह...

एक कॉल, आणि तात्काळ सेवा; ब्रह्मपुरी पोलिसांचे ‘डायल ११२’चे आवाहन.

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी वाढती गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अधिक हायटेक झाले आहे. नागरिकांना कोणत्याही संकटसमयी...

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

error: Content is protected !!