Homeउद्योगपुण्यात बिल्डरची फसवणूक करून फ्लॅटवर बेकायदेशीर ताबा; प्रविण ओसवाल यांच्या विरोधात कोंढवा...

पुण्यात बिल्डरची फसवणूक करून फ्लॅटवर बेकायदेशीर ताबा; प्रविण ओसवाल यांच्या विरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल…

Times Of Maharashtra Desk : पुण्यातील कोंढवा परिसरात एका नामांकित बिल्डरची फसवणूक करून, फ्लॅटचे पूर्ण पैसे न देताच बेकायदेशीरपणे ताबा मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रकाश रामचंद्र जैन (वय ५२, रा. बिबवेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रविण मंचलाल ओसवाल आणि भारती प्रविण ओसवाल यांच्या विरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
फिर्यादी प्रकाश जैन यांचा बांधकाम व्यवसाय असून, त्यांनी कोंढवा येथील ‘मंडोत टॉवर्स’ (मंडोत प्रॉपर्टीज) मध्ये फ्लॅट विक्रीचा व्यवहार केला होता. प्रविण ओसवाल यांच्याशी त्यांचे जुने ओळखीचे संबंध असल्याने, ओसवाल यांनी २०११ मध्ये १० व्या मजल्यावरील १०३३ क्रमांकाचा फ्लॅट घेण्याचे ठरवले होते.

व्यवहाराची अट फ्लॅटची एकूण किंमत ७० लाख रुपये ठरली होती. त्यापैकी सुरुवातीला २० लाख १० हजार रुपये देण्यात आले होते. उर्वरित ४९ लाख ९० हजार रुपये ७ महिन्यांच्या आत देणे बंधनकारक होते.
अटींचे उल्लंघन  जर ७ महिन्यांत व्यवहार पूर्ण झाला नाही, तर १० टक्के रक्कम कापून घेऊन व्यवहार रद्द केला जाईल, असे करारनाम्यात स्पष्ट नमूद होते. मात्र, ओसवाल यांनी वारंवार सांगूनही उर्वरित रक्कम दिली नाही.

धमकावून बेकायदेशीर प्रवेश
ऑगस्ट २०२५ मध्ये, प्रविण ओसवाल यांनी आपल्या साथीदारांसह जैन यांच्या ऑफिसवर जाऊन फ्लॅटचा ताबा देण्यासाठी दबाव आणला. यावेळी जैन आणि त्यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. व्यवहार पूर्ण न झाल्यामुळे जैन यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवून व्यवहार रद्द केला होता.
PMC चे सील तोडून ताबा
धक्कादायक बाब म्हणजे, सदर फ्लॅटवर पुणे महानगरपालिकेचा (PMC) कर थकीत असल्याने पालिकेने तो फ्लॅट सील केला होता. मात्र, नोव्हेंबर २०२५ मध्ये आरोपींनी कोणतीही परवानगी न घेता, दरवाजाचे कुलूप आणि पालिकेचे अधिकृत सील तोडून फ्लॅटमध्ये बेकायदेशीर प्रवेश केला. इतकेच नाही तर, फ्लॅटचे लाइट बिल देखील स्वतःच्या नावे करून घेतल्याचा आरोप जैन यांनी केला आहे.
पोलीस कारवाई
या प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेऊन, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ५) यांच्या परवानगीनंतर कोंढवा पोलिसांनी आरोपींविरुद्ध बेकायदेशीर प्रवेश, फसवणूक आणि धमकावल्याप्रकरणी कायदेशीर तक्रार नोंदवून घेतली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!