Homeमहाराष्ट्रवाजे विद्यालयात राजाराम सोनवणे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात; कार्याचा गौरव

वाजे विद्यालयात राजाराम सोनवणे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात; कार्याचा गौरव

सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) : येथील वाजे विद्यालयातील ज्येष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक राजाराम सोनवणे यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला. अनेक वर्षांच्या सेवेत त्यांनी प्रामाणिकपणा, निष्ठा आणि जबाबदारीची जपणूक करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे यावेळी मान्यवरांनी अधोरेखित केले.

मुख्याध्यापक रामनाथ रायते यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सोनवणे यांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. प्रयोगशाळेतील उपकरणांची योग्य देखभाल, प्रयोगांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच शिक्षकांना सातत्याने सहकार्य या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा शांत, संयमी आणि सहकार्यशील स्वभाव हा विद्यालयासाठी प्रेरणादायी ठरला असून त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी शिक्षक महेंद्र आढाव यांनीही सोनवणे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान सोनवणे यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

आपल्या मनोगतात सोनवणे यांनी विद्यालयाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते व्यक्त करत सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. “विद्यालय हीच माझी खरी ओळख आहे,” असे भावनिक शब्द त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन निशिगंधा सोनवणे यांनी केले. या प्रसंगी उपमुख्याध्यापिका मंगला हांडे, पर्यवेक्षक पांडुरंग करपे, विजयानंद कुमावत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विकासाच्या गजरात हरवलेला माणूस : भारताच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): भारत प्रगतीच्या वाटेवर असल्याचे दावे रोज ऐकायला मिळतात. तंत्रज्ञान, उद्योग, महामार्ग, डिजिटल क्रांती यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा वापर...

0
दौंड (प्रतिनिधी तुषार शेटे):संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन संपूर्ण महाराष्ट्रात "एकल महिला दिवस" म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश...

गुळवंच येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): परंपरागत कृषि विकास योजना (पीकेव्हीवाय) अंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम...

“महा-उपलब्धी” मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा; शासनाचा डिजिटल प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण टप्पा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी "महा-उपलब्धी" हे एकात्मिक मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ते...

योग : भारतीय संस्कृतीचा अमर वारसा आणि आधुनिक जीवनाची संजीवनी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्याची कला म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत जन्माला आलेली ही जीवनपद्धती आज...

error: Content is protected !!