Homeताज्या बातम्या"महा-उपलब्धी" मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा; शासनाचा डिजिटल प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण टप्पा

“महा-उपलब्धी” मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा; शासनाचा डिजिटल प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण टप्पा

गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी “महा-उपलब्धी” हे एकात्मिक मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ते १ जुलै २०२६ पासून कार्यान्वित होणार आहे. या माध्यमातून निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध सेवा, माहिती व प्रमाणपत्रे एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याने लाखो ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे निवृत्तीवेतनधारकांना अधिदान व लेखा कार्यालय तसेच कोषागार कार्यालयांच्या वारंवार फेऱ्यांपासून मुक्तता मिळणार असून डिजिटल प्रशासनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे.
राज्यातील अनेक निवृत्तीवेतनधारक हे ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना मासिक निवृत्तीवेतनाचा तपशील, महागाई भत्ता फरक, उत्पन्नाचा दाखला, नमुना क्र. १६ तसेच इतर कागदपत्रांसाठी कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष जावे लागत होते. या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या ई-शासन सुधारणा उपक्रमांतर्गत संचालक, लेखा व कोषागारे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या सहकार्याने हे ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपद्वारे निवृत्तीवेतनाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या सेवा एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
“महा-उपलब्धी” या ॲपच्या पहिल्या टप्प्यात निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन देयक इतिहास, उत्पन्न प्रमाणपत्र, ई-निवृत्तीवेतन आदेश संग्रह, नमुना क्र. १६, निवृत्तीवेतन विषयक शासन निर्णय तसेच विविध नवीन सूचना व घोषणा उपलब्ध होणार आहेत. निवृत्तीवेतनधारकांना त्यांचा मासिक व वार्षिक निवृत्तीवेतनाचा तपशील पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करता येणार आहे. तसेच उत्पन्नाचा दाखला, ई-निवृत्तीवेतन आदेश, ई-कुटुंब निवृत्तीवेतन आदेश, नमुना क्र. १६ आणि शासन निर्णयही मोबाईलवर सहज उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पारदर्शकता वाढण्यासोबतच सेवा वितरण अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
हे ॲप अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रणालींवर उपलब्ध करून देण्यात येणार असून जिल्हा कोषागार कार्यालये, अधिदान व लेखा कार्यालये तसेच संबंधित संघटनांमार्फत याची व्यापक प्रसिद्धी करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र आणि ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली देखील उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. त्यामुळे भविष्यात निवृत्तीवेतनधारकांचे बहुतांश काम घरबसल्या पूर्ण होणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे डिजिटल सेवा अधिक लोकाभिमुख आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ होणार असल्याचे मानले जात आहे.
“महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप हे निवृत्तीवेतनधारकांसाठी अत्यंत उपयुक्त आणि लोकाभिमुख पाऊल आहे. ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक कागदपत्रे, निवृत्तीवेतनाची माहिती आणि विविध सेवा घरबसल्या उपलब्ध होणार असल्याने त्यांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचेल. डिजिटल प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.”
– चंद्रकांत प्रकाश शेळके
तहसीलदार, बीड

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रीडा विभागातर्फे संचालक बाबासो रोहित रंधे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा,खेळाडूंना गणवेश वाटप

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) अल्पोपहाराचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा शिरपूर-वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक बाबासो रोहित विजयराव रंधे यांचा वाढदिवस किसान विद्या प्रसारक...

वाळूजमध्ये ‘शब्बो’चा मायेचा चमत्कार; सात वर्षांपासून मातृत्वाची आस, तरीही रोज देते दीड-दोन लिटर दूध!

0
मालकाला आईची उणीव भासू नये म्हणून शेळीने जपलेली ‘शब्बो’; परिसरात कुतूहल, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाळूज महानगर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज महानगरातील टेकडी गल्ली परिसरात निसर्गाचा अनोखा...

आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श सिन्नरच्या बहिरू शेठ भजीवाल्यांच्या प्रामाणिकपणाची तालुकाभर चर्चा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात प्रामाणिक माणसं आहेत का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र सिन्नर शहरातील श्री दत्त कृपा...

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

error: Content is protected !!