Homeपर्यावरणमाण-खटावमध्ये पाणी घोटाळ्याचे गंभीर आरोप; पाटबंधारे अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

माण-खटावमध्ये पाणी घोटाळ्याचे गंभीर आरोप; पाटबंधारे अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

शेतकरी (प्रतिक्रिया महेश कांबळे): म्हसवड दि. ७ माण–खटाव तालुक्यातील पाणी वाटपाचा प्रश्न आता गंभीर राजकीय आणि प्रशासकीय संघर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचला असून, जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्या कारभारावर “संगनमत, भ्रष्टाचार आणि नियोजित पाणी घोटाळा” असे गंभीर आरोप होत आहेत. सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करत प्रशासनाला थेट अंतिम इशारा दिला आहे.

करचे यांनी सादर केलेल्या निवेदनानुसार, माण तालुक्याच्या पूर्व भागातील वळई, जांभुळणी, गंगोती, पुळकोटी, शिरताव, देवापूर, पळसावडे, बनगरवाडी या गावांना अद्याप एकदाही पाणी आवर्तन मिळालेले नाही. याउलट वरच्या भागातील गावांना दोनदा पाणी देण्यात आल्याने “हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नसून उघड भेदभाव आणि शेतकऱ्यांच्या हक्कांची पायमल्ली आहे,” असा आरोप करण्यात आला आहे.

महेश करचे यांनी म्हटले आहे की, “पाणी वाटपातील ही तफावत ही साधी चूक नसून नियोजित पद्धतीने राबविण्यात आलेला पाणी घोटाळा (Organized Water Scam) आहे. संबंधित अधिकारी आणि काही स्थानिक घटक यांचे संगनमत असल्याची iशक्यता नाकारता येत नाही. निवडणुका आल्या की पाणी येते आणि निवडणुका संपल्या की तेच पाणी गायब होते. माण–खटावमध्ये वर्षानुवर्षे पाण्यावरून फक्त राजकारण केले जात आहे. पाणी ही सार्वजनिक संपत्ती असून शेतकऱ्यांचा तो मूलभूत हक्क आहे. मात्र प्रशासन स्वतःलाच त्या पाण्याचा मालक समजू लागले आहे. आता माण–खटावची जनता हा अन्याय सहन करणार नाही.”

दरम्यान, वडजल परिसरात कॅनॉलमधील पाणी बेकायदेशीररीत्या अडवून वळवले जात असल्याचे पुरावे समोर येत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने “पाणी चोरीला प्रशासनाचे मूक संरक्षण मिळत आहे,” असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

करचे यांनी पुढे सांगितले की, “निवडणुकांच्या काळात ठराविक भागाला पाणी सोडणे आणि प्रत्यक्ष दुष्काळाच्या तीव्र काळात त्याच भागाला पाण्यापासून वंचित ठेवणे, हा स्पष्ट राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासनाचा पक्षपातीपणा दर्शवितो.”

माणच्या उत्तर भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून शासनाला टँकरद्वारे कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागत आहे. तरीही ‘जिहे–कटापूर’ योजनेतून पाणी न सोडणे हे “जनतेच्या पैशाचा जाणीवपूर्वक अपव्यय” असल्याचे त्यांनी नमूद केले.

याप्रकरणी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, शाखा अभियंते व संबंधित अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ आणि महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ अंतर्गत तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, १२ मे २०२६ पर्यंत समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा सुरू न झाल्यास आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल न झाल्यास, १३ मे रोजी म्हसवड येथे शेतकऱ्यांसह उग्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी मा. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिक जबाबदार (Personal Liability) धरण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

माण–खटावमधील पाणी प्रश्नामुळे आता केवळ प्रशासनावरच नव्हे, तर राजकीय पातळीवरही मोठा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

१) सौ. स्वाती अण्णासाहेब व्हरकाटे, माजी सरपंच, पळसावडे :
“पळसावडे गावाला आजपर्यंत तारळी योजनेचे एकदाही पाणी मिळालेले नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिके जळून जात आहेत, जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही आणि गावातील लोक अक्षरशः हतबल झाले आहेत. एकीकडे कॅनॉलमधून पाणी वाहते, पण आमच्या वाट्याला फक्त कोरडी आश्वासने येतात. प्रशासनाने आमच्या गावाला जाणीवपूर्वक वाळीत टाकले असून, हा केवळ अन्याय नाही तर आमच्या अस्तित्वावर घाला आहे.”

२) योगेश झिमल, शेतकरी, गंगोती :
“पाणी येणार या विश्वासावर आम्ही बँकेचे आणि सावकारांचे कर्ज काढून ढोबळी मिरची, टोमॅटो, भाजीपाला, डाळिंब अशा पिकांमध्ये लाखोंची गुंतवणूक केली. पण आता पाणीच मिळालं नाही तर आमच्या डोळ्यांसमोर संपूर्ण पिकं जळून जात आहेत. जनावरांना पाणी नाही, घराघरांत चिंता आणि नैराश्य आहे. अधिकारी फक्त आश्वासनं देतायत; पण शेतकरी रोज आर्थिकदृष्ट्या संपत चाललाय. आम्हाला दया नको, आमच्या हक्काचं पाणी द्या… नाहीतर उद्या शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

जामनेर पंचायत समितीतील कंत्राटी तांत्रिक सहाय्यकावर लाचखोरी प्रकरणी गुन्हा दाखल

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): जामनेर पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी तांत्रिक सहाय्यक सागर अशोक नावकर (वय ३२, रा. गणपतीनगर, तळेगाव, ता. जामनेर) याच्याविरुद्ध सिंचन विहिरीच्या...

error: Content is protected !!