Homeक्राईमजळगावमध्ये ACB ची धडाकेबाज कारवाई; सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ...

जळगावमध्ये ACB ची धडाकेबाज कारवाई; सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ…

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी : विनोद पवार) :- 
जळगाव जिल्ह्यात लाचलुचपतखोरीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसताना, आज शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईमुळे शासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली असून, प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना शाखा अभियंता योगेश अहिरे यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एका नोंदणीकृत कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध विकासकामे पूर्ण केली होती. संबंधित कामांची लाखो रुपयांची बिले प्रलंबित होती. ही बिले मंजूर करून देण्यासाठी शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी तब्बल १५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने गोपनीय पद्धतीने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. पुढील तडजोडीनंतर पहिल्या टप्प्यात ५ लाख रुपये देण्याचे ठरले होते.
आज दुपारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे पहिल्या हप्त्याची ५ लाख रुपयांची रोकड स्वीकारत असतानाच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अचानक कारवाई करत शाखा अभियंता योगेश अहिरे यांना रंगेहात पकडले आणि तात्काळ अटक केली.
या कारवाईमुळे संपूर्ण शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

महसूल खात्यात भ्रष्टाचाराचे जाळे? जनतेच्या विश्वासावर घाला; आता सर्वंकष चौकशीची वेळ!

0
  निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज राज्यातील सर्वसामान्य नागरिकाचा महसूल विभागाशी सर्वाधिक संबंध येतो. जमिनीची खरेदी-विक्री, सातबारा उतारा, फेरफार, वारस नोंद, मोजणी, सीमांकन,...

error: Content is protected !!