Homeक्राईमवारकऱ्याचा मुलगा बनला मुंबईचा फौजदार; सुनील केकाणे यांचे पोलिस उपनिरीक्षकपदी यश...

वारकऱ्याचा मुलगा बनला मुंबईचा फौजदार; सुनील केकाणे यांचे पोलिस उपनिरीक्षकपदी यश…

सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) : तालुक्यातील पूर्व भागातील नि-हाळे फत्तेपूर येथील वारकरी कुटुंबातील सुनील सुरेश केकाणे यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घालत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

श्रीराम भजनी मंडळाचे वारकरी तसेच शेतीमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे ह.भ.प. सुरेश महाराज केकाणे व रंजना केकाणे यांचे सुपुत्र असलेल्या सुनील केकाणे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या खात्यांतर्गत मर्यादित विभागीय पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यातून १२९ वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.

सुनील केकाणे हे क्रांतीवीर वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय, नि-हाळे फत्तेपूर येथील माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तर बारावीपर्यंतचे शिक्षण ब्रह्मानंद महाविद्यालय, दोडी येथे पूर्ण केले. त्यानंतर नांदूर शिंगोटे येथील सम्राट करिअर अकॅडमीमध्ये पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेत त्यांनी २०१७ मध्ये मुंबई रेल्वे पोलिस दलात प्रवेश मिळविला.

मुंबई रेल्वे कंट्रोल रूम येथे कार्यरत असताना तसेच माजी फोर्स वन कमांडो म्हणून सेवा बजावत असतानाच त्यांनी वरिष्ठ पदाचे स्वप्न उराशी बाळगले होते. कर्तव्य बजावत अभ्यासात सातत्य ठेवून त्यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले.

या यशामध्ये पत्नी दिपाली केकाणे, बंधू विनोद केकाणे तसेच सासरच्या नातेवाईकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. मोठे बंधू शरद केकाणे, मुंबई पोलिस यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले.

मुंबई येथे माननीय पोलिस आयुक्त एम. राकेश कलासागर यांच्या हस्ते सुनील केकाणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नि-हाळे फत्तेपूर ग्रामस्थ आणि क्रांतीवीर वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाच्या वतीनेही नुकताच त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

यावेळी संस्थेचे संचालक बंडूनाना भाबड, समाधान गायकवाड, सरपंच सौ. वंदना सांगळे, मुख्याध्यापक आर. बी. बच्छाव, राजेंद्र वाघ, विलास दराडे, सुरेश केकाणे, भगवान कातकाडे, साहेबराव कुटे, सुरेश कातकाडे, विष्णू सांगळे, नानासाहेब दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

महसूल खात्यात भ्रष्टाचाराचे जाळे? जनतेच्या विश्वासावर घाला; आता सर्वंकष चौकशीची वेळ!

0
  निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज राज्यातील सर्वसामान्य नागरिकाचा महसूल विभागाशी सर्वाधिक संबंध येतो. जमिनीची खरेदी-विक्री, सातबारा उतारा, फेरफार, वारस नोंद, मोजणी, सीमांकन,...

अल्पवयीन मुलांच्या वाहनचालकांविरोधात जळगाव शहर वाहतूक शाखेची धडक मोहीम; ४८ पालकांवर कारवाई

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) शहरातील वाढत्या वाहतूक अपघातांच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई...

error: Content is protected !!