जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार ) : दि. ३ जून सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या उद्या, दि. ४ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुरोगामी पत्रकार संघ, कर्तव्य दक्ष पोलीस मित्र फाउंडेशन, राष्ट्रीय हिंदू संघटना तसेच शहर व जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी सत्कार समारंभ, वृक्षारोपण, सामाजिक जनजागृती उपक्रम, गरजूंना मदत, तसेच समाजहिताचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार असून समाजातील विविध घटकांचा या उपक्रमांमध्ये सहभाग राहणार आहे.
पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या विनोद पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांमुळे सामाजिक बांधिलकीचा संदेश समाजात पोहोचणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
जिल्ह्यातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक या कार्यक्रमांना उपस्थित राहून विनोद पवार यांना शुभेच्छा देणार आहेत.






















