देऊगाव (प्रतिनिधी बबनराव नागरे): दिनांक 3 जून 2026 रोजी भगवान बाबा चौक चिखली रोड देऊळगाव राजा येथे सर्व धर्मीय व स्मारक समिती ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब ग्रामीण विकास मंत्री भारत सरकार यांच्या पुण्यतिथी निमित्त छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रथम गोरगरीब ,कष्टकरीसामान्य जनतेच्या प्रश्नाची जाणीव गोरगरीबांचे कैवारी असलेले नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
‘अमर रहे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
सदर कार्यक्रमासाठी शैक्षणिक, सामाजिक, राजकिय शेतकरी, कष्टकरी सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी व देऊळगाव राजा नगर वाशी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















