Homeताज्या बातम्याई-लायब्ररीला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ नाव द्या; शिवसेनेची प्रशासनाकडे मागणी

ई-लायब्ररीला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ नाव द्या; शिवसेनेची प्रशासनाकडे मागणी

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ब्रह्मपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील प्रशासकीय कार्यालयाच्या मागे नव्याने सुरू करण्यात आलेली ई-लायब्ररी विद्यार्थी आणि नागरिकांच्या ज्ञानसाधनेसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या अत्याधुनिक डिजिटल ग्रंथालयाला ‘छत्रपती शिवाजी महाराज ई-ग्रंथालय’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील सविस्तर निवेदन ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष योगेश मिसार यांना सोपविण्यात आले.

शिवसेना शहर प्रमुख अमोल माकोडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. आजच्या डिजिटल युगात तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांची आणि प्रगतीशील दृष्टिकोनाची प्रेरणा मिळणे गरजेचे आहे. शिवराय हे केवळ एक महान योद्धे नव्हते, तर ते अठरा पगड जातींच्या सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे एक उत्तम प्रशासक, दूरदृष्टी असलेले राजे आणि अद्वितीय ज्ञानाचे पुरस्कर्ते होते, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाचा आणि त्यांच्या लोककल्याणकारी कार्याच्या प्रभावातूनच महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली वाटचाल समृद्ध केली. या ई-लायब्ररीचा मुख्य उद्देश डिजिटल साक्षरता आणि ज्ञानाचा प्रसार करणे हाच आहे. त्यामुळे या वास्तूला शिवरायांचे नाव दिल्यास ते सर्वांसाठीच अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरेल, असे अमोल माकोडे यांनी सांगितले.

निवेदन देताना शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय पारटवार, तालुका प्रमुख नरेंद्र नरड, युवासेना तालुका प्रमुख आकाश शेंद्रे, उपतालुका प्रमुख कवळू पिंपळकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सागर माकडे, सुरज माकडे, आशिष गांडलेवार, राकेश भुते, अंकुश भागडकर, गणेश लांजेवार, अनुराग तोंडासे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. या रास्त मागणीवर नगर परिषद प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गोरगरीबांसाठी ‘देवदूत’ ठरत आहेत तहसीलदार अजय सकुंदरवार

0
सिरोंचा (प्रतिनिधी जाबिर खान) : सिरोंचा तालुक्याचे तहसीलदार अजय सकुंदरवार हे आपल्या लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे, तत्पर प्रशासनामुळे आणि जनतेप्रती असलेल्या संवेदनशील दृष्टिकोनामुळे नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय...

खराडीत जमीन वादाला हिंसक वळण; नगरसेविकेचे पती प्रीतम खांदवे यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

0
पुणे: खराडी परिसरातील एका जागेच्या वादातून सुरक्षारक्षकास मारहाण केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेतील नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या...

माजी सैनिक स्व दत्तात्रय शिंदे यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे): स्वर्गीय दत्तात्रय शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि १० जून रोजी उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन, रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम व वृक्षारोपण...

आलेगाव-खोरवडी परिसरात मध्यरात्री सशस्त्र दरोडा; ७.१० लाखांचा ऐवज लंपास

0
दौंड (प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड): दि. १० जून : दौंड तालुक्यातील आलेगाव व खोरवडी परिसरात मध्यरात्री पाच ते सात अज्ञात दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत...

दौंडच्या इतिहासात मानाचा तुरा; बारसा बॉईज फुटबॉल क्लबची चौथी भव्य स्पर्धा उत्साहात संपन्न

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड): बारसा बॉईज फुटबॉल क्लब, दौंड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली चौथी वार्षिक फुटबॉल स्पर्धा दिनांक ६ व ७ जून रोजी उत्साहपूर्ण...

error: Content is protected !!