Homeताज्या बातम्याअमळनेर तालुक्यात मोटरसायकल, कार आणि एसटी बसची जोरदार धडक

अमळनेर तालुक्यात मोटरसायकल, कार आणि एसटी बसची जोरदार धडक

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : मंगरूळ येथे भीषण तिहेरी अपघात : सहा जण जागीच ठार
अमळनेर अमळनेर-धुळे रस्त्यावर मंगरूळ गावाजवळ सोमवारी (दि. ९) सकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास भीषण तिहेरी अपघात झाला. मोटरसायकल, कार आणि एसटी बस यांच्या अपघातात सहा जण जागीच ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोटरसायकल क्रमांक एमएच १८ सी ८७१९ आणि एसटी बस क्रमांक एमएच १३ सीयू ७५४० ही वाहने अमळनेरकडून धुळ्याकडे जात होती. त्याचवेळी धुळ्याकडून येणारी कार क्रमांक जीजे १९ एएफ ३१४७ ही भरधाव वेगात येऊन एसटी बस आणि मोटरसायकलला जोरदार धडकली.

अपघात इतका भीषण होता की मोटरसायकलचा पूर्ण चेंदामेंदा झाला असून धरणगाव येथील मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. तसेच कारमधील महिला व पुरुष मिळून एकूण सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये गुजरातमधील व्यारा येथील आदित्य चंद्रकांत महाजन, अनिता सुरेश महाजन, निर्मला नंदलाल महाजन, नंदलाल गोपाल महाजन आणि सुरेश विक्रम महाजन यांचा समावेश असून हे सर्वजण साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी अमळनेर येथे येत होते.

११२ आपत्कालीन सेवांची तत्पर कारवाई
अपघाताची माहिती मिळताच ११२ आपत्कालीन सेवेला संपर्क करण्यात आला. त्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवी पाटील तसेच पोलीस पाटील भागवत पाटील घटनास्थळी दाखल झाले.
जखमींना १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रवाना करण्यात आले. कारमध्ये एक लहान मुलगा अडकून पडला होता. गावकरी, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अपघातात एसटीमधील दीपक दिलीप पाटील हे जखमी झाले आहेत.

मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

error: Content is protected !!