Homeमहत्त्वाचेविशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला वेग ; प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे विशेष पुनरीक्षण अभियान...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला वेग ; प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे विशेष पुनरीक्षण अभियान प्रभावीपणे सुरू

गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ( एस . आय . आर . ) २०२६ अभियानाला बीड जिल्ह्यात वेग आला असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात घराघरात जाऊन गणना प्रपत्र भरून घेण्याची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे .

प्रशिक्षणार्थी आयएएस दिव्यांक गुप्ता , अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक , उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोज घोडे पाटील , उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी कविता जाधव यांच्या समन्वयातून महसूल व निवडणूक यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असून प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे . काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतः विविध भागांना भेटी देऊन या मोहिमेचा शुभारंभ करत प्रत्यक्ष पाहणी केली होती . त्यानंतर जिल्हाभरात या अभियानाला अधिक गती मिळाली आहे .

प्रशासनाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे ग्रामीण तसेच शहरी भागात बूथस्तरीय अधिकारी ( बी . एल . ओ . ) यांच्या मदतीसाठी स्वस्त धान्य दुकानदार , ग्राम रोजगार सेवक , महसूल सेवक , बूथस्तरीय अधिकारी सहाय्यक तसेच स्थानिक प्रशासनातील कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे . त्यामुळे घराघरात पोहोचून गणना प्रपत्र वितरित करणे , माहिती पडताळणी करणे , आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेणे आणि नागरिकांच्या शंकांचे निरसन करणे हे काम अधिक वेगाने सुरू आहे . लोकसहभाग वाढावा यासाठी गावपातळीवर जनजागृती मोहीमही राबविण्यात येत आहे .

दि . ५ जुलै २०२६ रोजी रात्री १० . ०० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार बीड जिल्ह्यातील २१ लाख ९३ हजार ८२७ मतदारांपैकी २ लाख ८४ हजार ७० मतदारांना गणना प्रपत्रांचे वितरण करण्यात आले असून हे प्रमाण १२ . ९५ टक्के इतके आहे . त्यापैकी ४३ हजार ९०१ गणना प्रपत्रांचे संगणकीकरण पूर्ण झाले असून २ . ०० टक्के काम पूर्ण झाले आहे . ४३ हजार ५२७ प्रपत्रांची बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडून पडताळणी पूर्ण झाली असून केवळ ३७४ प्रपत्रे मतदारांकडून भरून देण्यात आली असली तरी त्यांची पडताळणी अद्याप शिल्लक आहे . प्रशासनाने ही प्रगती समाधानकारक असल्याचे सांगितले असून पुढील काही दिवसांत हे अभियान अधिक वेगाने राबविण्यात येणार आहे .

दरम्यान , बीड तालुक्यातील विविध गावांमध्ये महसूल व निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून विशेष जनजागृती करण्यात येत असून ग्रामसभा , बैठका , प्रत्यक्ष घरभेटी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहभागातून नागरिकांना गणना प्रपत्र अचूक भरून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे . प्रत्येक मतदाराने आपले नाव , पत्ता , जन्मतारीख , भ्रमणध्वनी क्रमांक , कुटुंबाचा तपशील , आवश्यक कागदपत्रे आणि अद्ययावत छायाचित्र उपलब्ध करून देत बूथस्तरीय अधिकारी ( बी . एल . ओ . ) यांना सहकार्य करावे , असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे .

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की , अचूक , पारदर्शक आणि सर्वसमावेशक मतदार यादी तयार करणे ही लोकशाही बळकट करण्याची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे . प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचून कोणताही मतदार वंचित राहणार नाही , यासाठी प्रशासन कटिबद्ध असून सर्व नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा . प्रशासन , महसूल विभाग , बूथस्तरीय अधिकारी , सहाय्यक कर्मचारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून बीड जिल्ह्यातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ( एस . आय . आर . ) मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे , असे आवाहनही त्यांनी केले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्य उत्पादन शुल्क विभागातील बदल्यांवर संशयाचे सावट; मेडिकल ग्राउंड आणि ‘DPC’वरून खळबळ

0
मुंबई (प्रतिनिधी विशेष ): राज्य उत्पादन शुल्क विभागातील यंदाची बदली प्रक्रिया पारदर्शकतेऐवजी संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून, मेडिकल ग्राउंडचा आधार घेत सोयीच्या ठिकाणी बदली करून...

सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान ५ वर्षीय बालकाचा मृत्यू; पालकांकडून वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप, चौकशीची मागणी

0
सिरोंचा तालुका:(प्रतिनिधी जाबिर खान)सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पाच वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेनंतर पालकांनी वैद्यकीय...

भावपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी अहिल्यानगर पोलीसांच्या ताब्यात सुपूर्त

0
सिन्नर : प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर संस्थानातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला असून, नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील प्रवास पूर्ण...

₹२.५६ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीत खान्देशला डावलले?; सत्ता असूनही जळगावला मेगा प्रकल्पाची प्रतीक्षा कायम

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र शासनाने राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी तब्बल ₹२.५६ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे १८ मेगा प्रकल्प जाहीर केले आहेत. या...

मोबाईलपासूनमैदानाकडे… नगरसेविकास्वातीनिलेशसावंतयांचाप्रेरणादायीउपक्रम; मुलांनाक्रीडासाहित्याचेवाटप

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ६ येथील नगरसेविका स्वाती निलेश सावंत...

error: Content is protected !!